Download App

आमदार मोनिका राजळेंना पितृशोक; माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचं निधन

गापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केलं

Ashok Patil Dongaonkar Passes Away : माजी राज्यमंत्री व गंगापूरचे माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर यांचं आज शनिवार (दि. 5 जुलै)रोजी निधन झालं. ते गेली आठ वर्षे आजारी होते. सरपंच ते राज्यमंत्री असा राजकीय प्रवास करणारे अशोक पाटील डोणगावकर यांनी कॉंग्रेस पक्षातून आपलं राजकारण केलं. उद्या अंतसंस्कार होणार आहेत.

गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केलं. १९९५ ते ९७ या कालावधी मध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. गंगापूर तालुक्यात भगिरथी शिक्षण संस्था व मुक्तेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. वाळुज गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते.

Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवलं, दोघांचा मृत्यू

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि भूविका बॅकेचे सचालक म्हणून त्यांनी काम केले होते. १९९५ मध्ये त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. १९८३ मध्ये त्यांनी गंगापूरमध्ये मुलींची शाळा काढली होती. गंगापूर तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते.

१९९५ मध्ये शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर अपक्षाची बाजू मांडणारे नेते अशी अशोक पाटील डोणगावकर यांची ओळख होती. मराठवाड्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांचे ते वडील होत.

follow us

संबंधित बातम्या