Arun Tanpure Joins NCP : माजी राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठा धक्का दिला आहे. डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, तसंच बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. (NCP) अरुण तनपुरे हे प्राजक्त तनपुरे यांचे चुलते आहेत. आता यावर शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेतात याककडं सर्वांच लक्ष लागलं आहे.
नुकत्याच झालेल्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरेंनी एकतर्फी विजय मिळवत कारखाना ताब्यात घेतला. कारखान्याला नवसंजीवनीची आशा असल्याने सत्तेपासून दूर राहून चालणार नाही, असा समज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
तनपुरे कारखाना बंद पाडणारे पडद्यामागचे सूत्रधार तेच; विखे-कर्डिलेंवर तनपुरेंचे गंभीर आरोप
या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी महत्त्वपूर्ण शिष्टाई केली. प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढील आठवड्यात अरुण तनपुरे यांचे समर्थक व स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सामूहिक अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते असलेले अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने प्राजक्त तनपुरे यांची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री. पंजाबराव दादा देशमुख आणि राहुरी येथील श्री. अरुण तनपुरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. pic.twitter.com/Uz48823mPy
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 25, 2025