मोठी बातमी, पुण्यातून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण

Tanaji Sawant : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे.

Rishiraj Sawant

Rishiraj Sawant

Tanaji Sawant : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत (Rishiraj Sawant) यांचं पुणे विमानतळावरून (Pune Airport) अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झालं नसून ते फिरायला गेल्याची माहिती तानाजी सावंत यांच्या स्वीय सहायकांकडून देण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी देखील आपल्याकडे कोणतेही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याच बरोबर सावंत कुटुंबियांनी देखील याबाबत कोणतीच फिर्याद दिली नसल्याची ही माहिती पुढे येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरून गायब झाला आहे असा कॉल पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला होता. सध्या या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ऋषीराज सावंत यांनी दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज सावंत गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? ‘या’ दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय

ऋषीराज सावंत यांचं अपहरण कुणी आणि का? केला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. माहितीनुसार, तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज परिसरातील निवासस्थानी पोलिसांचे एक पथक पोहोचले आहे. त्या निवासस्थानी कुणाचे फोन आले होते का किंवा खंडणी मागण्यात आली होती का? याची माहिती देखील पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच पोलिसांकडून ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड देखील तपासले जात आहे.

Exit mobile version