Former minister’s son handcuffed in Vaishnavi Hagavane case; This is how Hagavane father and son helped : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.त्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित आणखी काहींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये माजी मंत्र्यांच्या मुलाला देखील अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात CID चौकशी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणे यांना अखेर शुक्रवारी 23 मे रोजी पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांनी एका खेडेगावातून अटक केलीयं. सात दिवसांपासून हे दोघेही बापलेक फरार होते. सात दिवसांत वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे सारखा फिरत होता. यावेळी त्यांना काहींनी मदत केली.
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा, बंद होणार POCSO खटला
त्या पाचही जणांना आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये कर्नाटकमधील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील याचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत मोहन भेगडे, मोहन बंडू फाटक, अमोल जाधव आणि राहुल जाधव या पाचही जणांना पुणे पोलिसांनी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याबद्दल अटक केली आहे. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल.
फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणे भोवले
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या पाच जणां विरोधात बावधन पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला. त्यामध्ये प्रितम वीरकुमार पाटील याने कर्नाटकमधील कोगनोळी येथे हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिला. मोहन भेगडे हा राजेंद्र हगवणे यांचा मित्र. मोहन बंडू फाटक हा पवना डॅमजवळील फार्महाऊसचा मालक. अमोल जाधव याने साताऱ्यातील पुसेगाव येथे फार्महाऊसवर आसरा दिला.राहुल जाधव याने अमोल जाधव यांच्यासोबतच पुसेगाव येथे आसरा दिला.
नगरकरांनो सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अहिल्यानगरसाठी यलो अलर्ट जारी
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत येत्या 26 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र, दीर सुशील यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर आता पाच जणांना पुणे पोलिसांनी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याबद्दल अटक केली आहे. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल.