वीस लाख हुंड्यासाठी छळवणूक; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न…, राजेंद्र हगवणे कनेक्शन समोर

Vaishnavi Hagavane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण (Vaishnavi Hagavane Case) राज्यात गाजत असताना पुन्हा एकदा राज्यात वीस लाख हुंड्यासाठी एका महिलेचा सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याची माहिती समोर आली आहे. या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात देखील राजेंद्र हगवणे (Rajendra Hagvane) कनेक्शन समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे.
सुयश चौधे (Suyash Choudhe) यांच्या पत्नीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात नवरा सुयश चौधे, दीर संकेत चौधे, सासरा नरेश चौधे, सासू वैशाली चौधे यांच्या विरोधात पाच महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनला आणि चार महिन्यापूर्वी महिला आयोगाला तक्रार करुन देखील कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा पीडितेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणात सासू काळी जादू करते आणि लग्नात दोन लाख हुंडा आणि दोन तोळे सोनं दिल्यानंतरही सासरच्या लोकांकडून वारंवार पैशाची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे. तसेच वीस लाख हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून छळवणूक आणि मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप देखील पीडितेकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सुयश चौधेविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये बायकोचा छळ व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले व इतिहास जपण्याचे काम करु, खासदार लंकेंचे प्रतिपादन
राजेंद्र हगवणे कनेक्शन
तर दुसरीकडे या प्रकरणात राजेंद्र हगवणे कनेक्शन देखील समोर आला आहे. माहितीनुसार, वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे ज्या थार गाडीतून फिरत होता ती थार गाडी पीडितेचा दीर संकेत चौधे याची होती. अशी माहिती देखील समोर आली आहे.