Download App

मराठवाड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, ‘हा’ मोठा नेता अजित पवारांच्या गळाला, प्रवेशही ठरला

थरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर हे प्रतिनिधित्व करत असल्याने महाविकास आघाडीमध्ये पाथरी

Babajani Durrani will join NCP Ajit Pawar faction : मराठवाड्यात गेली अनेक दिवसांपासून राजकीय पटलावर ज्यांचं मोठ नाव आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अखेर राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटात जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मराठवाड्यात धक्का मानला जात आहे. काल पाथरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाला आहे.

येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय वाटचाली संदर्भात चर्चा झाली आणि यावेळेस सर्वांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झालं असल्याचंही सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला अजित पवार गटात जाण्याचा निर्णय दुर्राणी यांनी घेतला होता. सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत जिल्ह्यामध्ये पक्षाची धुरा देखील सांभाळली. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.

लाडकी बहीण योजनेत अनेक चुका, अपात्र महिलांवर कारवाई होणार? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा विधानसभा 2025 निवडणुकीच्या वेळी बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर हे प्रतिनिधित्व करत असल्याने महाविकास आघाडीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडेच राहिली. त्यामुळे नाराज होऊन माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

बाबाजानी दुरानी यांचा अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अजित पवार गटाकडे दुर्राणी गेल्यामुळे आता जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही मजबूत होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी होताना दिसत आहे.

follow us