Download App

माजी आमदार राहुल जगतापांनी केली भूमिका स्पष्ट, सांगितले मी ‘या’ पवारांबरोबर

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत अशा प्रतिक्रिया देत आहेत.(Former MLA Rahul Jagtap’s role is clear, I said ‘come’ with Pawar)

बंडानंतर अजित पवार यांच्याबरोबर अनेक आमदार असल्याचा दावा अजित पवारांच्या गटाकडून केला जात आहे. तसेच अनेक आमदार आपल्या भूमिका स्पष्ट करत आपण कोणाबरोबर आहोत हे सांगत आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राहुल जगताप यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट सांगितल्याने श्रोगोंद्यातील राजकीय पेच संपला आहे. या घडामोडीनंतर राहुल जगताप काय भूमिका घेतात याकडे सर्व श्रीगोंदा मतदारसंघाचे लक्ष लागले होते. राहुल जगताप हे अजित पवारांच्या जवळचे असून देखील त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना झटका; शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई

राहुल जगताप हे श्रीगोंद्याचे माजी आमदार आहेत. 2024 विधासभेसाठी ते श्रीगोंद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. श्रीगोंद्यामध्ये सध्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले बबनराव पाचपुते आमदार आहेत. अजित पवार भाजपसोबत गेल्याने राहुल जगताप आणि आमदार बबनराव पाचपुते एकत्र येणार अशा चर्चा मदारसंघात राबगु लागल्या होत्या. परंतु जगतापांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचे सांगून सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात श्रीगोंदा मतदार संघात पुन्हा बनराव पाचपुते आणि राहुल जगतात असा सामना पाहायला मिळू शकतो.

 

 

 

Tags

follow us

वेब स्टोरीज