BJP Maharashtra : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, ओबीसी मोर्चा अध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ता या पदांचा समावेश आहे. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह, आमदार गोपीचंद पडळकर, रामदास कडस, भारती पवार, अतुल काळसेकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी नवनाथ बन पक्षात माध्यम प्रमुख म्हणून भूमिका बजावत होते. तर दुसरीकडे भाजपने मोठा निर्णय घेत महाराष्ट्र भाजपच्या कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेचा यांची निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तींची घोषणा करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली होती मात्र त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता सुरु झाल्याने प्रदेश कार्यकारणी व पदाधिकारी नेमणूक निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तर आता राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) , बी.एल. संतोष, शिव प्रकाश व सर्व नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील प्रमुख नेत्यांसह मी पदाधिकारी नेमणुकीबाबत चर्चा केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
भाजप पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे
भाजप प्रदेश उपाध्यक्ष
अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कोरगे
संजय भेंडे
रामदास कडस
केशव उपाध्ये
गोपीचंद पडळकर
प्रिया शिंदे
सुजय विखे पाटील
अर्चना पाटील चाकूरकर
कोषाध्यक्ष
मिहिर कोटेचा
भाजप महिला मोर्चा अध्यक्ष
चित्रा वाघ
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष
कृष्णराज महाडिक
भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष
योगेश टिळेकर
📍LIVE – पत्रकार परिषद- मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्र जी चव्हाण – २४ फेब्रुवारी २०२६ – नरिमन पॉईंट !!! https://t.co/0xZ5M2HltQ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 24, 2026
मुख्य प्रवक्ता
नवनाथ बन
भाजप सरचिटणीस
निरंजन डावखरे
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनिल राणे
योगेश सागर
भाजप चिटणीस
मंगेश चव्हाण
संजय कुटे
परिणय फुके
वर्षा डहाळे
संजय जगताप
अर्चना डेहणकर
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रविण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी घाक
