Former NCP MLAs from Mohol and Madha Rajan Patil and Yashwant Mane joined BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. मात्र यामध्ये भाजप जास्तच आघाडीवर आहे. कारण भाजपने आता तेथ शिंदे आणि अजित पवार या मित्र पक्षांना सुरूंग लावत ‘हुकमी एक्के’ गळाला लावले आहेत. त्यात मोहोळ आणि माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने हे भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचा हा पक्षप्रवेश भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे मोहोळ आणि माढा तालुक्यात राजकीय गणित बदलणार एवढं नक्की.
Video: PM मोदी ‘किलर’ तर, पाकचा असीम मुनीर ‘महान सेनानी’; ट्रम्प पुन्हा बरळले
यावेळी मोहोळ आणि माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यासह विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील, प्रकाश चौरे, दीपक माळी, अश्लम चौधरी, भरत सुतकर, विक्रांत माने, सज्जन पाटील जालिंदर लांडे, प्रमोद डाके, कुंदन धोत्रे, राजाभाऊ गुंड, रत्नमाला पोतदार, जोत्सा वाघमारे, यशोदा कांबळे, राहुल मोहोळ यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. तर माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे हे भाजपमध्ये आले आहेत. तसेच भाजपने केवळ अजित पवार यांनाच नाही तर शिंदेंना देखील धक्का दिला आहे.
तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकरांच्या साखरपुड्याचे खास क्षण!
या पक्षप्रवेशावेळी बोलताना राजन पाटील म्हणाले की, सत्तेसाठी राजकारण करण्याचा आमचा वारसा नाही. आम्ही निष्ठेने एकाच पक्षात राहिलो आहोत. त्यामुळे आम्ही याठिकाणी स्थानिक भाजप कसा भक्कम होईल. येथे एकट्या भाजपचा झेंडा कसा लावला जाईल. यावर आम्ही काम करणार आहोत. आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही. जो पर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कमळच हाती ठेऊ. तर माने म्हणाले की, भाजप एका विचाराने वाढत आहे. कोणतीही निवडणूक स्वबळावर कमळ चिन्हावर निवडणूक लढवून सगळीकडे कमळ दिसेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
आजपासून सुरू होणार नवं प्रेम, नवा प्रवास! स्टार प्लस घेऊन येतय “माना के हम यार नही” ची खास कथा
दुसरीकडे भाजपने केवळ अजित पवार यांनाच नाही तर शिंदेंना देखील धक्का दिला आहे. मात्र त्यांनी राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिंदे गटाच्या नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांना पक्ष प्रवेश दिला आहे. क्षीरसागर यांचा प्रवेश म्हणजे पाच वर्षांनंतर भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपने दिग्गजांना पक्षात घेतले असून स्थानिक स्वराज्य संस्थांना या ठिकाणी गणितं बदलणार हे आता निश्चित झालं आहे.
आजपासून सुरू होणार नवं प्रेम, नवा प्रवास! स्टार प्लस घेऊन येतय “माना के हम यार नही” ची खास कथा
दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे भाजपला ताकदीचे नेते मिळाले आहेत. तर अजित पवार आणि शिंदेंना मात्र याचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा फटका बसू शकतो. यातील शिंदे पिता-पुत्रांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हणजे दत्तात्रय भरणे यांनी मनधरणी केली होती पण ते भाजपमध्ये जाण्यावर ठाम होते. त्यामुळे आता त्यांना कोणती संधी मिळणार त्याचा भाजपला काय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या प्रवेशामुळे जुने भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. असं अश्वासन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलं ते म्हणाले की, समाज्याच्या सर्व घटकांनासोबत घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. जुने-नवे हेवेदावे बाजूला ठेवून सरकारी योजना शेवटच्या घरापर्यंत पोहचवायचे आहे. तसेच जुन्या कोणावर अन्याय होणार नाही.प्रथम पक्ष,आपण एकच आहोत.
https://www.youtube.com/live/Qujxo8JM3v4?si=RkiJQVLS8SOEcNem
