Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसून येत आहे. यामध्ये वंदे भारत, मेट्रो, तेजस एक्स्प्रेस अशा विविध माध्यमातून रेल्वेचा विकास होताना दिसतो आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यामध्ये तीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे धावत आहे.
सर्वप्रथम मुंबई ते गांधीनर अशी ही रेल्वे सुरु झाली होती. यानंतर मुंबई ते सोलापूर व मुंबई ते गांधीनगर अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला होता. यानंतर राज्यात आणखी एक वंदे भारत रेल्वे धावणार आहे. त्यामुळे राज्यात आता चौथी वंदे भारत रेल्वे धावणार आहे.
WhatsApp मध्ये करता येणार सिक्रेट चॅट; मार्क झुकरबर्ग यांनी लाँच केले तगडे फिचर
कोकण रेल्वे मार्गावर आज वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली आहे. 16 डब्यांची रेल्वे या मार्गावरुन आज सुसाट धावली. ट्रायल रनसाठी ही रेल्वे मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधून सुटली. ही गाडी दुपारी 2.30 वाजता गोव्याच्या मडगाव येथे पोहोचणार आहे. त्यानंतर ही गाडी गोव्यावरुन पुन्हा मुंबईकडे येणार आहे. या ट्रायल रननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे.
दरम्यान, देशातील चार रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती करण्यात येते आहे. महाराष्ट्रातील लातूर येथे नव्या कारखान्याचे सूटे भाग आणि डबे तयार करण्यात येणार आहे. वंदे भारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांचा ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे.