Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धुमश्चचक्री सुरु असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदाराने वंदे भारत रेल्वे ते मणिपूर घटनेवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, विविध मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर घणाघात केला आहे. (vande mataram express to manipur violence supriya sule reveals everything in lok sabha)
‘मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय’; शेलारांची टीकेवर दानवेंचा घणाघात
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मोदी सरकारने देशात वंदे भारत रेल्वे सुरु केली आहे, पण माझ्या मतदारसंघात एकही रेल्वे थांबत नाही. माझ्या मतदारसंघात दौंड, निरा, आणि भिगवण स्टेशन आहे, युपीए सरकारच्या काळात माझ्या मतदारसंघातील रेल्वे स्टेशनवर दहा रेल्वे थांबत होत्या, आता एनडीए सरकारच्या काळात एकही रेल्वे थांबत नाही. वंदे भारत रेल्वे गरीबांसाठा नाही. त्यामध्ये प्रवास करणं अशक्यचं आहे, याला लोकशाहीचा सन्मान म्हणायचा का? असा सवाल सुळेंनी केला आहे.
पुणे अजित पवारांचचं, सभेत दादांबद्दल वाकडं बोलाल तर…; दीपक मानकरांचा इशारा
तसेच गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. हिंसाचारादरम्यान, मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात येत आहे, कसं सहन करायचं? त्या कोणाच्या तरी मुली, बहीण, पत्नी आहे, त्या भारताच्या मुली नाहीत का? असा सवाल करीत त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईने उच्चांक गाठला असून भाजीपाल्यांसह खाद्यपदार्थांच्या वस्तूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने जेवणाच्या थाळींच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. देशात कांद्याची निर्यात होत नसून महागाई रोखण्यात मोदी सरकार अयशस्वी ठरल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.