Download App

शेतकऱ्यांशी चर्चेसाठी ‘फुसके’ मंत्री नेमले, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

राज्य सरकाराने शेतकऱ्यांचा लॉन्ग मोर्चा संपला असं जाहीर केलं, पण मोर्चा संपलेला नाही. काल दुर्दैवाने मोर्चातील आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी प्रश्नांवर सरकारची बेफिक्री आहे, सरकारने वेळीच पाऊलं उचलली नाहीत, आंदोलकांशी चर्चेसाठी फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमले होते, अशी टीका खासदार संजय राऊत यांच्यावर केली. ते नाशिक येथे आज बोलत होते.

उद्धव ठाकरे यांची नाशिक येथे सभा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. आंदोलकांशी चर्चेसाठी फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमले होते. असं म्हणत त्यांनी दादा भुसे यांच्यावर टीका केली कारण चर्चेसाठी दादा भुसे आणि अतुल सावे यांना सरकारकडून पाठवण्यात आलं होत. ते पुढे म्हणाले की,  त्यांचं कोण ऐकणार?

Jayant Patil : वर्ष संपेपर्यंत शिंदे गटाचं…; जयंत पाटलांच्या विधानानं शिंदे गटाची धाकधूक वाढली

कोर्टाचा निकाल देखील विकत घेऊ का?

सरकार विरोधकांच्या नाड्या आवळण्यात बिझी आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की मुळात मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र माहित आहे का, हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न तरी माहित आहेत का, हा प्रश्न आहे. दुर्दैवाने याचं उत्तर नाहीच असेच आहे. त्यांना वाटतं की निवडणूक आयोगाप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील विकत घेऊ का, याची त्यांची तयारी सुरु आहे. पण आम्हाला खात्री आहे आम्हांला न्याय मिळेल.

काल बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४० जागा दिल्या जातील असं वक्तव्य केलं होत, त्यावर ही शिंदे गटाची लायकी आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. ज्या शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती. २०१४ साली स्वाभिमानासाठी आम्ही युती तोडली होती. ह्यांना कुठला स्वाभिमान आहे, त्यांना कायम तुकडे चघळून राहावं लागेल, अशी टीका त्यांनी केली.

भाजपला त्यांना शिवसेनेचा रुबाब, दरारा खतम करायचा होता. त्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली. पण खरी शिवसेना कोणती, हे जनता ठरवेल असा त्यांनी संगितलं.

डॉ. अजित नवले यांना समितीतून वगळलं, नवले यांच्या नावाला फडणवीसांचा विरोध?

Tags

follow us