Jayant Patil : वर्ष संपेपर्यंत शिंदे गटाचं…; जयंत पाटलांच्या विधानानं शिंदे गटाची धाकधूक वाढली

  • Written By: Published:
Jayant Patil : वर्ष संपेपर्यंत शिंदे गटाचं…; जयंत पाटलांच्या विधानानं शिंदे गटाची धाकधूक वाढली

Jayant Patil On Eknath Shinde Group : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपांवरून केलेल्या विधानावरून राज्यात पुन्हा भुकंप होतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता बावनकुळे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विझान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, अनेक चर्चांना उधाण आले आहे.

‘अंधारेंना कुटुंबही सांभाळता आले नाही, त्यांची लायकी..’, देवयानी फरांदेंची जळजळीत टीका

पाटील म्हणाले की, राज्यातील निवडणुकांना आणखी एक वर्ष बाकी आहे. मात्र, हे वर्ष संपेपर्यंत राज्यात शिंदे गटाचं नामोनिशाणही उरणार नाही. एकीकडे बावनकुळेंच्या विधानानंतर शिंदे गटात खळबळ माजलेली असताना आता जयंत पाटील यांच्या भाकितामुळे शिंदे गटातील नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आगामी काळात ज्यावेळी विधानसभे निवडणुका लागतील त्यावेळी भाजप सर्व 288 जागांवर निवडणुका लढवेल असेही पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत शिंदे गट टिकेल याबाबत साशंकता आहे.

डॉ. अजित नवले यांना समितीतून वगळलं, नवले यांच्या नावाला फडणवीसांचा विरोध?

भाजपवर हल्लाबोल
यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपकडून स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम होत असून, मित्र आणि शत्रूला फोडून त्यांचं अस्तित्व संपवणे हे भाजपचं एक कलमी काम असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. निवडणुका आल्या की भाजपकडून सर्व्हे केला जातो. या सर्व्हेनंतर शिंदे गटाला केवळ पाच ते सात जागांवर लढण्यास सांगितले जाईल आणि या आदेशाचे पालक करण्याशिवाय शिंदे गटाकडे दुसरा पर्याय नसेल.एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपला असं वाटतंय की, आपली मते हे पक्ष खाणार आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. स्थानिक पक्षांना नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मतं आपल्या मागे वळवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो असेही जयंत पाटील म्हणाले. अजून सव्वा वर्ष निवडणुकीला असताना ४८ जागा शिंदे गटाला आहेत ते निवडणूकीच्या जवळ आल्यावर शिवसेनेच्या किंवा शिंदे गटाच्यावतीने जो काही त्यांचा पक्ष असेल त्याना ५-६ जागा मिळतील बाकीच्या सगळ्या भाजपच्या नावावर लढवल्या पाहिजे असे ऐनवेळी शिंदेंना सांगितले जाईल असेही जयंत पाटील माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube