Gajanan Kirtikar : शिवसेना पक्षातील एक बडा नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असून लवकरच शिंदे यांची साथ सोडत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, माजी खासदार गजानन कीर्तिकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याने पुढील दोन दिवसात ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या प्रमुखाशी संपर्क होत नाही असं माध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी असल्याचं स्पष्ट केलं.
माध्यमांशी बोलताना गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) म्हणाले की, मी घरवापसी करणार नाही, मी दल बदलू नाही. मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठीमागे उभा आहे पण मी नाराज आहे. कारण आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांची भेट होत नाही. काही जनहिताच्या काम असतात. आम्ही शिवसेना (Shivsena) नेता असल्यामुळे अन्यायग्रस्त लोक येतात. सरकारकडून न्याय मिळावा म्हणून लोक येतात. त्यांच्यासाठी आम्हाला संपर्काची गरज असते.
तसेच भेटीची गरज असते. परंतु भेट होते नाही म्हणून मी नाराज आहे असं माध्यमांशी बोलताना कीर्तिकर म्हणाले. तसेच मला पद वगैरे काही नको. जसा प्रतिसाद मिळाला पाहिजे तसा पक्षाकडून मिळत नसल्याने मी नाराज आहे. गजानन कीर्तिकर नाराज असल्याने ते पुढील काही दिवसात मोठा निर्णय घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
शमी, बुमराहसह 5 खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत करणार कमबॅक
तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणी 30 ऑक्टोबरपर्यंत संपणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यता आली आहे. एका सुनावणी दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असं तोंडी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी या प्रकरणात निकाल येण्याची शक्यता वर्तुवण्यात येत आहे.
