ठाकरेंच्या पारड्यात आणखी एक विजय; अमोल कीर्तिकर 2 हजार मतांनी विजयी
LokSabha Election Result Amol Kirtikar Win Ravindra Vaikar defeat : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ( LokSabha Election Result ) सुरू आहे. त्यात राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असाताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईमध्ये आणखी एक विजय खेचून आणला आहे. त्यात उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर ( Amol Kirtikar ) 2 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर ( Ravindra Vaikar ) यांचा पराभव केला आहे.
महाराष्ट्र, युपीमध्ये भाजपला धक्का तर, ‘या’ दोन राज्यात मुसंडी
2019 ला ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी पक्ष फुटीनंतर या जागेवर उमेदवारी देण्यावरून चांगलंच राजकीय नाट्यरंगलं होतं. त्याचं कारण म्हणजे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये असलेले गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. मात्र कीर्तीकर हे जरी शिंदे गटात असले तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
राज्यातील दोन्ही राजे लोकसभेत! उदयनराजेंनी वचपा काढला तर कोल्हापुरकरांचंही छत्रपतींच्या गादीलाच मत
ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने पिता-पुत्रांमध्ये ही लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र शिंदे गटाकडून या मतदारसंघात नुकतेच ठाकरे गटातून आलेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी झाली होती. ज्यामध्ये काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सुरुवातीला उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ज्यावरून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. निरूपम यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्याचा फटका ठाकरे आणि महाविकास आघाडीला बसला नाही. तर पक्षफुटीचा फटका शिंदेंना बसला असल्याचं स्पष्ट झालं आहे.