मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशनला जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ नाव द्या; अश्विनी वैष्णवांची भेट घेत वायकरांची मागणी

Change name of Mumbai Central Railway Station as Jagannath Urf Nana Shankar Sheth; Ravindra Vaikar demands after meeting Ashwini Vaishnav : मुंबई शहराच्या विकासात अमुल्य योगदान देणारे तसेच सामाजिक सुधारणेत बहुमूल्य भूमिका बजावणारे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचे नावे मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशनला देण्यात यावे, यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी समस्त मुंबईकरांतर्फे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
डिजीटल पेमेंटचं पुढचं व्हर्जन आलं; नखाला ATM चिप लावून पोरीनं सक्सेसफुल्ल केलं पेमेंट, पहा व्हिडिओ
नाना शंकर शेठ हे एक महान समाज सुधारक, शिक्षा प्रेमी और दानशूर व्यक्तिमत्व होते. मुंबई शहराच्या जडण घडणीत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशातली पहिली रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. १८ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिले भारतीय रेल्वे धावली होती ती कंपनी होती ग्रेट पेनिनसुलर रेल्वे कॉर्पोरेशन. या कंपनीत दोन भारतीय निर्देशक होते. यातील एक जगन्नाथ शंकर शेठ व दुसरे जमशेद्जी जीजीभाय. रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशनसाठी पैसा, जमीन बरोबरच आवश्यक ती सर्व मदत केली. नाना शंकर शेठ यांच्या मनात प्रथम रेल्वे लाईन टाकायचा विचार आला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात उतरवलाही. मुंबईची लोकल हि मुंबईकरांची जीवनवाहिनी बनली आहे. नाना शंकर शेठ या जीवनवाहिनीचे जनक आहेत.
कर्जतच्या मेडिकल कॉलेजसाठी रोहितदादांची थेट फडणवीसांकडे फिल्डिंग; शिंदेंना भारी पडणार?
नाना शंकर शेठ यांनी फक्त रेल्वेमध्ये नाही तर समाज व देशाच्या प्रगतीसाठी अनेक सामाजिक कार्य केले आहे. मुंबईतील एशियाटिक लायब्रेरी व विधान परिषदचे पहिले भारतीय सदस्य होते. मुंबई शहराच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःची जमीन दान केली. मुंबईतील विविध शिक्षण संस्था निर्मितीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ज्यात मुंबई विद्यापीठ, एलफिस्टन कॉलेज. ग्रांट मेडीकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेज तसेच मुंबईतील पहिल्या महिला कॉलेजचा समावेश आहे. नाना शंकर शेठ यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे मुंबई रेल्वेच्या ट्रॅकवर आहे.
मोठी बातमी! छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा नक्षलवाद मुक्त; केंद्र सरकारने LWF यादीतून नाव हटवलं
त्यांच्या या कार्याचा व योगदानाचा सन्मान करण्यासाठी मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकास त्यांचे नाव देणे संयुक्तिक ठरणार असून यामुळे देशातील भावी पिढीला त्यांच्या या कार्याने प्रेरणा मिळणार असल्याने मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशनला जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन नाव देण्यात यावे अशी मागणी समस्त मुंबईकरांच्यावतीने लोकप्रतिनिधी म्हणून रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांच नाव देण्याप्रश्नी मुंबई दौऱ्या दरम्यान संबंधित शिष्ट मंडळाची भेट घेणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार वायकर यांना दिले.