डिजीटल पेमेंटचं पुढचं व्हर्जन आलं; नखाला ATM चिप लावून पोरीनं सक्सेसफुल्ल केलं पेमेंट, पहा व्हिडिओ

डिजीटल पेमेंटचं पुढचं व्हर्जन आलं; नखाला ATM चिप लावून पोरीनं सक्सेसफुल्ल केलं पेमेंट, पहा व्हिडिओ

next version of digital payment Girl successfully makes payment by putting ATM chip on her fingernail : यूपीआय ही सर्विस आल्यापासून ज्याप्रमाणे आर्थिक व्यवहार एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे नवनवीन तंत्रज्ञानामुळे डिजीटल पेमेंट करणं अधिकाधिक सुलभ होत चाललं आहे. त्यात आता आणखी एक आगळावेगळा प्रयोग समोर आला आहे. यामध्ये एका मुलीने थेट आपल्या नखामध्ये ATM चिप लावून पेमेंट केलं आहे. काय आहे हे नेमकं प्रकरणं जाणून घ्या…

कर्जतच्या मेडिकल कॉलेजसाठी रोहितदादांची थेट फडणवीसांकडे फिल्डिंग; शिंदेंना भारी पडणार?

यूपीआय ही सर्विस आल्यापासून ज्याप्रमाणे आर्थिक व्यवहार एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे.त्यामुळे आता एटीएममधून कॅश काढून व्यवहार करण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे लोक आला एटीएम कार्ड बाळगत देखील नाहीत. मात्र एका तरूणीने थेट आपल्या नखामध्ये ATM चिप लावून पेमेंट केलं आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरलं होत आहे. या तरूणीच सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

मोठी बातमी! छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा नक्षलवाद मुक्त; केंद्र सरकारने LWF यादीतून नाव हटवलं

मात्र हे खरच शक्य आहे का? तर नाही. हे केवल चित्रपटांमध्येच होऊ शकत. कारण मेटल चिप असो किंवा सिम कार्ड असो ते तेव्हाच काम करतात जेव्हा ते त्याला रीड करणाऱ्या मशीनच्या संपर्कात येतात. जसं एटीएम मशीनमध्ये कार्ड पुर्णपणे इन्सर्ट व्हावं लागत तेव्हाचं ते स्क्रिनवर दिसत. त्याचबरोबर कार्ड टॅप करून होणाऱ्या व्यवहारांमध्ये कार्डमधील तांब्याच्या तारेच्या कॉईलद्वारे व्यावहार होतो. हे तंत्रज्ञान वायरलेस चार्जिंग आणि फास्टॅगमध्ये ही वापरलं जात.

मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा आणि दीर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

NFC एक कमी अंतरावरील वायरलेस कनेक्टिविटी टेक्निक आहे जी NFC-enabled devices ला एकमेकांसोबत जोडण्यासाठी ब्रिजचं काम करते. NFC दोन उपकरणांमध्ये कनेक्शन बनवण्यासाठी विद्युत चुंबकीय रेडियो क्षेत्रांच्या (electromagnetic radio fields) माध्यमातून डेटा प्रसारित करतो. यासाठी दोन्ही उपकरणांमध्ये NFC चिप्स असणं गरजेचं आहे. कारण व्यवहार हे निश्चित आणि कमी अंतरावरच होतो.

‘त्या’ नोटांच्या ढिगाबाबत जस्टिस वर्मांकडे स्पष्टीकरण नाहीच; आता महाभियोग चालवला जाणार

डेटा ट्रान्सफरसाठी NFC-enabled devices एकमेकांसोबत टच कऱणारे किंवा काही सेमींच्या अंतरावर असणे गरजेचे असते.2004 मध्ये टेकच्या तीन दिग्गज कंपन्या असलेल्या नोकिया, फिलिप्स आणि सोनीने मिळून NFC फोरम गठित केलं. त्यानंतर नोकियाने 2007 मध्ये पहिला NFC-enabled phone लॉन्च केला होता. आज स्मार्टफोनमध्ये जी वॉलेट सुविधा आहे. ज्यामध्ये आपल्या कार्ड्सचे डिटेल्स सेव्ह केले जातात. ते NFC द्वारेच काम करते.

मिठीच्या घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल होणार; आमदार रवी राणांचा ठाकरे पिता-पुत्रांना इशारा

मात्र या व्हायरल व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर एक तर ही चिप कोणत्याही मशीनच्या संपर्कात येऊ शकत नाही. तसेच त्यावर अॅक्रिलिक रंग लावलेला आहे. तसेच पेमेंट देखील बारकोड स्कॅनरने चिप स्कॅन करून केलं जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पुर्णपणे फेक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube