Video : बच्चू कडूंनी पहिले होकार अन् मग नकार कळवला; फडणवीसांनी मध्यरात्रीची घडामोड सांगितली
नागपुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करत असून या आंदोलनाला आता उग्र वळण येऊ लागलं आहे.
CM Devendra Fadnavis On Bacchu Kadu Protest : कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे मानधन, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu Farmer Protest) यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बच्चू कडू यांना चर्चेला येण्याचं आवाहन केलं आहे. लोकांना त्रास होईल असं काही करू नये असे त्यांनी कडूंना सांगितले. यावेळी फडणवीसांनी मध्यरात्री बच्चू कडूंनी पाठवलेल्या मेसेजचाही खुलासा केला. ते पुण्यात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस इतके बनावट की, झेरॉक्स तरी बरी निघते; बच्चूभाऊंची कडू टीका
पहिले बच्चूभाऊंचा होकार अन् मध्यरात्री पाठवला नकार
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आंदोलनाच्या आधीदेखील आम्ही बैठक बोलवली होती. आपण चर्चा करून यातन ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं. पहिल्यांदा बच्चू कडूंनी (Bachu Kadu) त्याला मान्यताही दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी अर्ध्यारात्री मला संदेश पाठवला की लोकं जमा होतील आम्ही असणार नाही. यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही असे सांगितले. त्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. कडूंनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले असून, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. CM Devendra Fadnavis On Bacchu Kadu Protest
शेतकरी, व्यावसायिकांची संपूर्ण कर्जमाफी हवीच; सरकारला शरद पवारांच्या या पाच सूचना
हौसे गवसे आंदोलनात येतात
आंदोलनांमध्ये काही हवसेनसे गौसे असेही शिरतात. त्यांचा धोका असतो. अनेक लोक आंदोलनांमध्ये शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असाही प्रयत्न करत असतात. त्यामुळे संवाद साधण्याची आवश्यकता असून सावध राहणं गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. या सरकारने 32 हजार कोटी रुपयांचा पॅकेज दिलय. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातन मार्ग काढावा असेही फडणवीस म्हणाले.
सरकारचे दोन मंत्री दुपारी 4 वाजता बच्चू कडूंची भेट घेणार
नागपुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करत असून या आंदोलनाला आता उग्र वळण येऊ लागलं आहे. समृद्धी मार्गावर टायर जाळण्यात आले असून शेतकरी आणि आंदोलक निदर्शन करत आहेत. असं असतानाच आता सरकारचे मंत्री पंकज गोयल आणि आशिष जैस्वाल हे दोघे दुपारी ४ वाजता बच्चू कडूंची भेट घेणार आहेत.
🕧 12.24pm | 29-10-2025📍Pune.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/n5UoO2bXCJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 29, 2025
