अमोल कीर्तीकरांना धक्का! रविंद्र वायकरांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब, न्यायालयाचा मोठा निर्णय
Amol Kiritikar News : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत (Loksabha Election) निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Vaykar) यांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकरांना मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
“संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात नंतर..”, संघाचं कौतुक करताना शिंदेंच्या तोंडी जुन्या आठवणी
देशात 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीसाठी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल किर्तीकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला. अल्पशा मताने पराभव झाल्याने किर्तीकरांनी मतमोजणीत घोळ केल्याचा आरोप वायकरांवर करत त्यांना अपात्र करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
किर्तीकरांच्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज या प्रकरणावर सुनावणी पार पडलीयं. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने अमोल किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावलीयं. यासोबतच किर्तीकरांनी अनेक आरोपही केले होते.
मोठी बातमी : भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनचा मोठा निर्णय; क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित
उमेदवाराच्या प्रतिनिधीला बुथवर बसू दिलं नाही…
शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या निकटवर्तीयांना मोबाईल बाळगण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच मतमोजणी प्रक्रियेत निवडणुक अधिकाऱ्यांनी अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. फेरमतमोजणीसाठी अधिकाऱ्यांनी नकार दिला. कमी मताने पराभव झालेल्या उमेदवाराला फेरमतमोजणीचा अधिकार असूनही तो नाकारल्याचा आरोप अमोल किर्तीकरांनी दाखल याचिकेत केला होता.