Maharashtra Politics : राजकीय आखाड्यात वडिलांचाच पराभव करू पाहणारे ‘पुत्र’
Maharashtra Assembly Election Son Vs Father : लवकरच राज्यात विधानसभांचा धुराळा उडणार असून, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले आहे तर, काही दिग्गज ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकीय आखाड्यात आपल्याच वडिलांना परभूत करण्याचा विडा तीन नेते पुत्रांनी उचलला असून, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वडिलांविरोधात लढणाऱ्या या तीन नेते पुत्र कोण हे पाहुया…
वडिलांच्याच पराभवाचा विडा उचललेले नेते पुत्र कोण?
राजकीय खेळपट्टीवर वडिलांचा पराभव करण्याच्या तयारीत असलेल्या नेतेपुत्रांमध्ये पहिले नाव शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचे आहे. अमोल यांनी नुकतीच लोकसभाही लढवली होती. तर, दुसरे नाव भूषण देसाई आणि तिसरे नाव म्हणजे गोकुळ झिरवाळ यांचे आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये गोकुळ आणि भूषण यांनीही वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे.
अमोल कीर्तीकर बंड करत मैदानात
वडिलांविरोधात बंडाचं हत्यार बाहेर काढणाऱ्यांमध्ये अमोल कीर्तिकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर गजानन कीर्तीकर यांची शिंदे गटाने संसदीय पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती, परंतु त्यांचा मुलगा अमोल याने वडिलांविरुद्ध बंड केले.
“महायुतीत मला जागाच नाही म्हणून मी..” पंकजा मुंडेंचा इशारा नेमका काय?
अमोल यांनी वडील गजानन यांच्याविरुद्ध बंड करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबई उत्तर-पश्चिममधून उमेदवारी दिली. अमोल कीर्तिकर निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने गजानन कीर्तीकर यांना एक पाऊल मागे घेत माघार घ्यावी लागली. कारण, शिंदेंच्या शिवसेने गजानन कीर्तिकर यांच्या जागी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. मात्र, अमोल यांना निवडणूक जिंकता आली नाही. अमोल मुंबई उत्तर पश्चिममधून 48 मतांनी पराभूत झाले. हे प्रकरण अजूनही न्यायालयात असून, आता अमोल कीर्तीकर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. त्यासाठी अमोल यांनी तयारीही सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
जागावाटपाबाबत मोठी अपडेट! भाजप 155 ते 160, शिंदे अन् अजितदादांना मिळतील ‘इतक्या’ जागा
सुभाष देसाईंविरोधात भूषण देसाई मैदानात
उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते सुभाष देसाई यांच्या विरोधात त्यांचेच पुत्र भूषण देसाई रिंगणात आहेत. भूषण देसाई यांनी मार्च 2023 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता भूषण रत्नागिरी किंवा मुंबईतील एखाद्या जागेवरून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. सुभाष देसाई हे मुंबई-उपनगरातील शिवसेनेचा मोठा चेहरा असून, येथील संघटना बांधणीत त्यांचा मोठा वाटा आहे. 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले सुभाष देसाई फडणवीस आणि उद्धव यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. सुभाष यांची गणना ताकदवान नेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी उद्योग आणि खाण यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
Akshay Shinde Encounter : हा एन्काऊंटर होऊ शकत नाही, फॉरेन्स्किक रिपोर्ट द्या; मुंबई HC चे आदेश
गोकुळ विरुद्ध नरहरी झिरवाळ
नरहरी झिरवाळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. तसेच सध्या ते दिंडोरी मतदारसंघाचे आमदार आहेत. एवढेच नव्हे तर, येत्या विधानभा निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नरहरी झिरवळ यांना पुन्हा उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आहेत. मात्र, आता नरहरी झिरवळांना पहिला धक्का त्यांच्याच घरातूनच बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
भाजपला नगरी धक्का! पिचड पितापुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट; तुतारी हाती घेणार?
वडिलांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी संबंध तोडत शरद पवारांना साथ दिली आहे. तसेच मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, मात्र शरद पवारांनी इथून दुसऱ्या कोणाला उमेदवारी दिल्यास मी पाठिंबा देईन असेही गोकुळ यांनी म्हटले आहे. पण जर, शरद पवार यांच्या पक्षाने गोकुळ यांना उमेदवारी दिल्यास दिंडोरीची लढत पिता-पुत्रांमध्येच होणार असल्याचे बोलले जात आहे.