Ganesh Kapase Shocking Claim about Police Murder case by Pinya Kapases in Shevgaon : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडे गोळीबार अशा घटनांमुळे शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अक्षरश: धोक्यात आली आहे. यातच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गोळीबार झाल्याची घटना समोर आली. यामध्ये कुख्यात गुंड पिण्या कापसे याला देखील जबर मारहाण करण्यात आली. तर पिण्या कापसे याने गणेश कापसे याच्या पायावर गोळीबार केला. दरम्यान जखमी गणेश कापसे याने रुग्णालयात धक्कादायक माहिती दिली.
पोलीस मारला तरी माझं कोणी काही वाकडं करू शकलं नाही
कुख्यात गुंड सुरेश कापसे उर्फ पिण्या कापसे याने त्याच्या इतर चार साथीदारांसह मला पकडले व माझ्या पायावरती गोळीबार केला व कापसे मला म्हणाला की, माझी खूप ओळख आहे. मी पोलीस मारला तरी माझं कोणी काही वाकडं करू शकलं नाही. तसंच मी आत्ता एक माणूस मारला तरी पोलीस माझं काहीच करू शकत नाही.
सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; आता ‘मातृभूमी: में वॉर रेस्ट इन पीस’ नावाने येणार
तसेच पुढे बोलताना जखमी गणेश कापसे म्हणाला की, पिण्या कापसे म्हणाला की, पोलीस खातं माझ्याशी मॅनेज आहे. मी 302 सारखा गुन्हा करून देखील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील मला पकडू शकत नाही. तरी माझी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांना विनंती आहे की, अशा गुंडांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व मला न्याय मिळवून द्यावा.
‘कथा 2026’: सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे वंचित विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा भव्य आविष्कार
अशी मागणी हल्ल्यातील जखमी गणेश कापसे याने केली आहे. पोलीस प्रशासनाकडूनच अशा गुंडांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळेच गंभीर गुन्ह्यातील आरोपी असतानाही त्यांची सुटका होते व गुन्हेगारी वाढत आहे. पोलीसांचा खून करून देखील आरोपी मोकाट कसे फिरतात? असा सवाल देखील यावेळी जखमी कापसे याने केला.
लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!
दरम्यान जखमी गणेश कापसे याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच या गोळीबाराच्या घटनेमध्ये काही अज्ञातांकडून आरोपी व्यक्तीने कापसे यांनाही बेदम मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत जखमी झालेल्या पिण्याला देखील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर बोधेगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासनाने देखील योग्य ती खबरदारी घेत आहे.
