Download App

मोठी बातमी! पुण्यातल्या सिग्नलवर अश्लील चाळे; दोन मित्रांमधील एका मित्राला सत्र न्यायालयाकडून…

येरवडा चौकात दारू पिऊन धिंगाणा घातल्यानंतर गौरव कराडला गेला होता. तिथून त्यानं व्हिडीओच्या माध्यमातून माफीही मागितली

  • Written By: Last Updated:

Pune Gaurav Ahuja case : पुण्याच्या सिग्नलवर अश्लील चाळे केल्याप्रकरणी गौरव आहुजाच्या मित्राला जामीन मंजूर झाला आहे. भाग्येश ओसवाल याला पुणे सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. (Pune) भाग्येश ओसवाल हा गौरव आहुजा याचा मित्र आहे. आहुजाने अश्लील कृत्य केलं तेव्हा तो त्याच्यासोबत गाडीमध्ये होता.

पुण्यातील येरवडा भागात एका आलिशान गाडीतून उतरून गौरव आहुजाने एका सिग्नलवर लघुशंका करत अश्लील चाळे केले होते. यावेळी त्याचा मित्र भाग्येश ओसवाल हा गाडीत बसला होता. पुणे पोलिसांनी आहुजा यासोबत ओसवाल याला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने ओसवाल याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. बुधवारी पुणे सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

Video : पुण्यात भररस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचा माज उतरला, हात जोडून म्हणाला माफ करा

येरवडा चौकात दारू पिऊन धिंगाणा घातल्यानंतर गौरव कराडला गेला होता. तिथून त्यानं व्हिडीओच्या माध्यमातून माफीही मागितली आणि त्यानंतर पोलिसांसमोर हजर झाला होता. त्यानं बीएमडब्ल्यूची नंबर प्लेटही बदलली होती. पोलिसांनी त्याची कारही जप्त केली आहे.

आरोपी गौरव अहुजा आणि वडील मनोज अहुजा यांच्यावर क्रिकेट बेटींग तसेच खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याआधी ही त्यांनी जेलवारी केली असल्याची माहिती आहे. लॉटरी हा अहुजा कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे. सध्या हे कुटुंब हॉटेल व्यवसायातही उतरले आहे. त्यांचे पुण्यात एक हॉटेल आहे. तर दुसरीकडे क्रिकेट बेटींगच्या अवैध व्यवसायात ही अहुजांचा सहभाग असल्याचं समोर आलेलं होतं.

Tags

follow us