Video : पुण्यात भररस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचा माज उतरला, हात जोडून म्हणाला माफ करा

पुणे : विद्येचे माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळक असणाऱ्या पुण्यात आज (दि.8) महिला दिनी एका श्रीमंत बापाच्या पोरानं भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याचे समोर आले. यानंतर मोठी खळबळ उडाली असून, आता पुण्याचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सगळी माहिती दिली आहे. दरम्यान, हा फरार झालेला तरुण गौरव आहुजाचा माज उतरला असून त्याने व्हिडिओ करुन माफी मागितली आहे. (Who Is The Young Man Who Committed Vulgar Acts On Pune Shastri Nagar Road)
नराधम दत्तात्रय गाडेचा आणखी एक कारनामा; पोलीस गणवेशात फिरायचा अन्…
नेमकं काय घडलं?
शास्त्री नगर भागात घडलेली घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली असून, व्हायरल व्हिडिओतील मुलाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अहुजा असे आहे. गौरव आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. घटनेवेळी मद्यधुंद असलेल्या चालकाला लघुशंका करताना नागरिकांनी अडवले. त्यानंतर सबंधित युवकाने गाडीत बसल्यानंतर अडवणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव केले आणि भरधाव वेगात गाडी पुढे नेली. सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने वेगवान गतीने गाडी जात होते असे जाधव म्हणाले. स्थानिकांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केले आहे, ज्यामुळे चौकशी सुलभ होण्याची शक्यता आहे.
मद्यप्राशन केले होते का?
तरूणाने मद्य प्रशान केले होते की नाही, हे ताब्यात घेतल्यानंतर पाहून कारवाई करणार आहोत. पण, सध्यातरी व्हिडिओत बिअरची बाटली दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर काही कलमे लावण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
‘आम्हाला एक खून माफ करा…’, रोहिणी खडसेंचं ‘महिला दिनी’ थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं प्रकरण काय?
त्याने सिग्नलवर नाही तर, माझ्या तोंडावर लघुशंका केली
दुसरीकडे महिलादिनी अशा प्रकारची घटना घडल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असून, घडलेल्या घटनेवर गौरव अहुजाच्या वडिलांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. यात ते म्हणतात की, माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली आहे. तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते असे गौरवच्या वडिलांनी म्हटले आहे.
विद्येचे माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यातील गौरव आहुजाचा भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याचे समोर आले. त्याचा माज उतला असून त्याने माफी मागितली आहे.#Pune #punecrime pic.twitter.com/GMWEYaGC5y
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 8, 2025
खोक्या भोसलेवर शिकारीचा आरोप, वनविभागाचा पंचनामा; तपासात आढळल्या धक्कादायक गोष्टी
पोलिसांनी मला शास्त्रीनगर पोलीस चौकीत बोलावलं आहे. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलावलं आहे. माझ्या मुलाचं नाव गौरव मनोज अहुजा आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. आम्ही देखील त्याचा शोध घेत आहोत, असं म्हणत मुलांच्या वडिलांनी झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे.