Download App

चाकूने सपासप भोसकले…सातारच्या गौरीला बंगळुरूत संपवलं, पतीकडून क्रूर हत्या

Gaury Khedekar Killed by Husband In Bengaluru : महाराष्ट्रातल्या तरुणीची पतीकडून बंगळुरुमध्ये क्रूर हत्या (Gaury Khedekar Murder) केल्याची घटना समोर आलीय. इतकंच नव्हे तर हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला. गौरी खेडेकर असं मृत महिलेचं नाव असून राकेश खेडेकर असं मारेकरी पतीचं नाव (Crime News) आहे. हत्या करून राकेश बंगळूरहुन पुण्यात (Woman Killed by Husband) आला. त्यानंतर त्याने पुण्यातून घरमालकाला फोन केला. गौरीच्या मृतदेहाची तिला माहिती दिली. दरम्यान आरोपीने फिनेल पिऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे त्याला ससूनच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

यानंतर आरोपीला घेवून पोलीस बंगळुरूच्या (Bengaluru) दिशेने रवाना झाले आहेत. त्यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. गौरीचं माहेर हे साताऱ्यातील खंडाळाचं आहे. राकेश एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. मास मिडीयाची पदवीधर असलेली गौरी बंगळुरूत नोकरी शोधत होती. परंतु नोकरी मिळत नसल्याने वाद आणि आर्थिक ताण यामुळे तिची नवऱ्याने हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! सुदर्शन घुलेनं घेतलंल दुसऱ्याच व्यक्तीचं नाव, ‘हा’ कराड कोण?

गौरी खेडेकरच्या हत्येचा घटनाक्रम
राकेश आणि गौरीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. राकेशच्या नोकरीनिमित्त दोघंही गेल्याच महिन्यात बंगळुरूत राहायला गेली होती. हुमिलावू भागात त्यांनी एक घर भाड्यानं घेतलं होतं. गौरीला मनासारखी नोकरी मिळत नव्हती. त्यामुळं सारखी भांडणं होत होती. बुधवारी 26 मार्च रोजी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. रागाच्या भरात गौरीने स्वयंपाकघरातील चाकू राकेशला फेकून मारला. आधीच संतापलेला राकेश आणखीनच संतापला अन् त्याने त्याच चाकूने पत्नी गौरीला अनेकदा भोसकलं.

खंडणीचा उल्लेखच नाही….जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात वेगळंच

गौरीचा जागीच मृत्यू झाला, हे बघून राकेश संतापला. मृतदेह कुठेतरी दूर नेऊन फेकायचा, विचार त्याच्या मनात आला. म्हणून त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरला. पण आपल्याकडून हे होणार नाही, असं वाटल्यावर त्याने मृतदेह जागेवरच सोडला अन् कारने पुणं गाठलं. घरमालकाला फोन करून तातडीने पोलिसांना बोलवा म्हणून राकेशने सांगितलं. परंतु तोपर्यंत मुंबई पोलिसांना राकेशच्या फोनवरून त्याचं लोकेशन समजलं होतं. यानंतर राकेशने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. विष प्यायल्याने तो साताऱ्यातील शिरवळजवळ बेशुद्ध पडला होता.

 

follow us