माझ्यावर प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणूनच माझ्या कार्यक्रमाला गर्दी होत असल्याचं स्पष्टीकरण प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने दिलं आहे. दरम्यान, पुण्यातील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यावर गौतमी पाटीलने भाष्य केलं आहे.
Abortion : 26 आठवड्यांचा गर्भपातास परवानगी, मुंबई उच्च न्यायालायाचा महत्त्वाचा निर्णय
नुकत्याचं झालेल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमापेक्षा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी लगावला होता. याचवेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नृत्यांगणा गौतमी पाटीलचं समर्थन केलं आहे.
शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांच्या मनात 2 नावे! अमोल कोल्हे आणि….
आमदार मोहिते पाटलांच्या या टोलेबाजीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सौम्य शब्दांत समाचार घेतला. खेडचा आमदार दिलीप मोहिते एक वादग्रस्त विषय असून त्यांनी गौतमीची तुलना मुख्यमंत्र्यांसोबत करणं चुकीचं असल्याचं म्हटलंय.
आमदार मोहिते पाटील अज्ञानी असून ते वेड्यांच्या नंदनवनामध्ये जगत असल्याचा टोलाही लगावला आहे. पुण्यातल्या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चांगलीच शाब्दिक चकमक सुरु असल्याचं दिसतंय.
मोदींच्या आजूबाजूचे साधू ब्राह्मण नव्हते; भुजबळांचा तावडेंकडून समाचार
दरम्यान, या वाकयुद्धावरुन गौतमीला विचारलं असता तिने यावर बोलणं टाळलं आहे. पुढे बोलताना म्हणाली, प्रेक्षकांचे माझ्यावर असलेले प्रेम असल्याने माझ्या कार्यक्रमाला गर्दी होत असल्याचे गौतमी पाटीलने स्पष्ट केलं आहे.
एकंदरीत सर्व घडामोडींवर आता गौतमी पाटील आगामी काळात राजकारणा प्रवेश करणार? अशा चर्चांना उधाण आलं असून येणाऱ्या काळात गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार.