Download App

Gautami Patil, इंदुरीकर महाराज ते शिवलीला पाटील कोण किती पैसे घेतं?

  • Written By: Last Updated:

किर्तन आणि तमाशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपल्या महाराष्ट्रात या दोन्ही गोष्टी कायम चर्चेत असतात. त्याला कारणही तशीच आहेत. आताचा लेटेस्ट विषय म्हणजे इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधताना दिलेलं एक स्टेटमेंट. इंदुरीकर महाराज म्हणाले असं की तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. 

हे वाक्यच पुरेसं म्हणायचं की पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली की इंदुरीकर महाराज असो की गौतमी पाटील. नक्की पैसे घेतात किती ? तर जरा हेच समजून घेऊ.

इंदुरीकर महाराज, शिवलीला पाटील, नितीन बानगुडे पाटील  गौतमी पाटील पूर्ण महाराष्ट्रात ही नावे लोकांना माहिती आहेत. याचं कारण म्हणजे त्यांचे कार्यक्रम. या सगळ्याच लोकांच्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी जमते. तशी त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. म्हणूनच की काय त्यांच्याकडून तसे पैसेही आकारले जातात. तर सुरुवात करूया इंदुरीकर महाराजांपासूनच याच कारण म्हणजे सध्या विषय सुरु झालाय इंदुरीकर महाराजांमुळेच. 

शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार

खरंतर आपल्याकडच्या वारकरी संप्रदायाला आणि कीर्तन परंपरेला मोठा वारसा, मोठा इतिहास आहे. गावोगावी प्रबोधन करण्यासाठी सुरु झालेल्या कीर्तनाला सोशल मीडियात मोठी प्रसिद्धी मिळाली आणि इंदुरीकर महाराज राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या कीर्तनाला युट्युब, फेसबुकवर लाखो व्हीव्यू यायला लागले. तशी त्यांना राज्यभरातून मागणी यायला लागली.

मागच्या काही वर्षांपासून इंदुरीकर महाराजांच्या पुढील दोन वर्षापर्यतच्या तारखा बुक असतात. मागच्या आठवड्यात एका कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले कि गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. त्याच्या लगेच बातम्या झाल्या. मग प्रश्न आला  इंदुरीकर महाराज किती पैसे घेतात, तर आपल्या एका कीर्तनासाठी  इंदुरीकर महाराज ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतात.

तर याचाच पुढचा विषय येतो गौतमी पाटीलचा, खरंतर गेल्या काही महिन्यात सोशल मीडियावर तर गौतमी पाटीलची मोठी चर्चा आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याला मोठी गर्दी तर जमते पण त्या जमलेल्या गर्दीमुळे झालेला गोंधळ हाही मोठा चर्चेचा विषय आहे. तर गौतमी पाटील नक्की पैसे घेते असा एक प्रश्न आहे.

काही दिवसापूर्वी ओळखीच्याच एका कार्यकर्त्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. तर त्याने दिलेल्या माहितीनुसार गौतमी पाटीलची सुपारी सव्वा लाख रुपयांची आहे. बाकी कार्यक्रमाचा खर्च वेगळा. तर त्यामुळे गौतमी पाटीलचा एका कार्यक्रम म्हणजे काही लाखांचा विषय आहे.

“एक महिलेने मला…”, रवी किशनचा कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा!

तर आता कार्यक्रमाच्या पैशाच्या विषय निघालाच आहे तर आपल्याकडे बाकी काही लोक आहेत. त्यांचेही असे जाहीर कार्यक्रम होतात. त्याचाही थोडा आढावा घेऊच.

आपल्या शिवछत्रपतीवरील भाषणामुळे चर्चेत असलेलं नितीन बानगुडे पाटील यांचीही मोठी चर्चा असते. त्यांची भाषणे ऐकायलाही मोठी गर्दी होतच असते. बानगुडे पाटलांच्या इतिहासावरील व्याख्यानाची मोठी मागणी असते. तर काही लोकांशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळाली की बानगुडे पाटील एका कार्यक्रमासाठी ५० हजाराच्या आसपास पैसे घेतात. 

मागच्या काही दिवसापासून असंच एक नाव सोशल मीडियावर चर्चत आल्या होत्या. त्यांच नाव म्हणजे शिवलीला पाटील. कीर्तनकार म्हणून चर्चेत आलेल्या शिवलीला पाटील चर्चेत आल्या ‘बिग बॉस’मुळे. 

कीर्तन करता करता त्या अचानक बिग बॉस मध्ये गेल्या. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये गेल्यामुळे त्या मीडियाच्या समोर आल्या पण यामुळे त्याच्यावर मोठी टीका झाली. वारकरी संप्रदायातल्या लोकांकडूनही त्यावर टीका केली गेली, परिणामी शिवलीला पाटील काही दिवसातच त्यातून बाहेर पडल्या.

पण आजही सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा असते. तर शिवलीला पाटील एका कार्यक्रमाचे ३० हजार इतके पैसे घेतात. बाकी आता ही यादी बरीच मोठी होऊ शकते पण आता एवढच. 

निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Tags

follow us