Download App

सातारा : देवीच्या मिरवणुकीतील जनरेटरचा स्फोट; मूर्तीजवळ बसलेली नऊ मुले होरपळली

सातारा : महाबळेश्वर येथे दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट होऊन नऊ जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. काही जखमींना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर भाजलेल्या रुग्णांना पुण्याला नेण्यात आले आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. (Generator blast during immersion procession of Durga Devi in Mahabaleshwar, nine seriously injured)

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर शहरात कोळी आळी मधील देवीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी देवीच्या मूर्तीजवळ काही लहान मुले बसलेली होती. विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गावरून आली असतानाच जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला.

Maratha Reservation : ‘ट्रिपल इंजिन सरकारच आरक्षण देणार’; गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं

यात मूर्तीजवळ बसलेल्या नऊ मुलांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने मुले भाजून गंभीर जखमी झाले. यापैकी सात मुले चार ते सात वयोगटातील आहेत, तर एक मुलगा 19 आणि एक 24 वर्षीय युवक असल्याची माहिती महाबळेश्वर पोलिसांनी दिली.

Maratha Reservation : अल्टिमेटम संपला! आजपासून जरांगे पाटील पुन्हा मैदानात, ठिकठिकाणी आंदोलन

सुरुवातील सर्व जखमींना महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यातील काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्याला नेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी साताऱ्यातील रुग्णालयात धाव घेतली. याशिवाय प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनीही रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.

Tags

follow us