Chhatrapati Sambhajinagar Police : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस खात्यामधून धक्कादायक माहिती समोर आली. खोटं जात प्रमाणपत्र देत नोकरी मिळवली. प्रमोशन झाल्याने PSI पदापर्यंत गेला. (Sambhajinagar) पोलीस खात्यात 35 वर्ष नोकरी केल्यानंतर या कर्मचाऱ्याचं जात प्रमाणपत्राचे वैध नसल्याच आता समोर आलंय. त्याची आता नोकरी गेली आहे. पुढच्या वर्षी हा अधिकारी सेवानिवृत्त होणार होता. गफार पठाण असं संबंधित कर्मचाऱ्याचं नाव आहे.
गफार पठाण यांचं जात प्रमाणपत्र खोटं व बनावट असल्याची तक्रार त्यांच्या सख्ख्या बहिणीनेच दिल्याचं समोर आले. गफार पठाण हे 31 जानेवारी 1990 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस खात्यात शिपाई पदावर रुजू झाले. ही नोकरी मिळवताना सादर केलेल्या जात प्रमाणपत्रात तडवी जात नोंदवण्यात आली. 2015 मध्ये पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर त्यांना पदोन्नती मिळाली. मात्र, जात प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर हे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं समोर आलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोकाट तरुणांची टोळी; शाळा-महाविद्यालयांबाहेर पोलिसांनी दिला चोप
या घटनेचा तपासात पठाण यांचे परिवार सामान्य मुस्लिम समाजातून आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात गफार पठाण यांची दुसरी बहीण जेव्हा इदरीस खान यांनी 22 जुलै 2015 रोजी समितीकडे लेखी तक्रार करत गफार यांचं प्रमाणपत्र खोटं असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. दरम्यान, पोलीस खात्यामध्ये नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून बेकायदेशीरपणे जागा हस्तगत केल्याप्रकरणी कलम 10 ते 12 अन्वये तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
या फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा म्हणजे, निलंबन, आजपर्यंत शासनाकडून प्राप्त केलेला पगार वसूली करणं, खोटे जात प्रमाणपत्र बनवून फसवणूक अशा आरोपानखाली गुन्हा नोंदवणं अशा शिक्षांचा समावेश आहे. दरम्यान, गफार पठाणला काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, या घटनेने पोलीस खात्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.