Girl dies in the middle of the night, family members did funeral secretly in the morning; Shocking incident in Jalna : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकून घेतल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या घटनेवर संशय आल्याने पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थली भेट देत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता परस्पर तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली. तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
अबब! सचिनचा लेक अर्जुन ‘इतक्या’ संपत्तीचा मालक; वाचा कुठून कमावतो पैसा?
मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली…