Download App

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा ..! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

मुंबई : सोनं खरेदीकरिता गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) मुहूर्त अनेकजण साधत असतात. आज देखील सराफाबाजारामध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली. मात्र गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर वाढत असले तरी हौसेला मोल नसतं. यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर आणि लग्नसराईचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक जण आज सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात आलेले दिसत आहे.

आजच्या मुहूर्तावर सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्त पैकी एक प्रमुख मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याच्या मुहूर्ताकडे बघितलं जाते. गुढी पाडव्याचा मुहूर्त हा सोने खरेदीचा मुहूर्त म्हणून मानला जातो. अनेक नागरिक आजच्या दिवशी सोने खरेदी करून हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत असतात. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केलेली सोन्याची खरेदी ही शुभ राहत असते. या दिवशी केलेली खरेदी भरभराटी देणारी असते अशी अनेक ग्राहकांची श्रद्धा आहे. ग्राहक या दिवशी सोने खरेदी करत असतात.

Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

यंदा मात्र सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सोने खरेदीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी गुढी पाडव्याला मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. यंदा सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी येणार का? अशा प्रकारची चिंता व्यापाऱ्यांना लागली होती.

मात्र गेल्या २४ तासात सोन्याच्या दरात १५०० रुपयांची घसरण झाल्याने आज सोन्याचे भाव 58 हजार 800 तर जीएसटीसह 60 हजार 500 रुपये इतके आहे. हेच भाव काल 59 हजार 300 तर जीएसटीसह 62 हजार 050 इतके होते. आजची घसरण पाहून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगली संधी निर्माण झाल्याने सकाळपासूनच ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संपूर्ण दिवसभरात ग्राहक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितल आहे.

Tags

follow us