Download App

Gold Rate : अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी घसरण, प्रतितोळ्याचा दर…

जळगाव : गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक गंभीर असाल आणि त्यासाठी पर्याय शोधत असाल तर एक नवा पर्याय पुढे आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2022-23 ची चौथी सीरीज (Sovereign Gold Bond Scheme 2022-23 – Series IV) लॉन्च केली आहे. जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ युनायटेड स्टेटच्या वतीने ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये वाढ होण्याची शक्यता पाहता त्याचा मोठा परिणाम सोन्याच्या दरावर (Gold Prices) झाले आहे.

जळगावमध्ये (Jalgaon) गेल्या २४ तासात सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.अर्थसंकल्पानंतरच्या काळाचा विचार केला असता तर सोन्याच्या दरामध्ये सतत दर वाढ झाली असल्याचे बघायला मिळाले आहे. जीएसटीबरोबर ६० हजार रुपये इतकी मोठी उच्चांकी दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करणे अवघड गेले होते. परिणामी काही ग्राहकांनी सोने खरेदी करणे थांबवले होते तर अनेकांनी तर वाढत्या दराचा फायदा घेत आपल्याकडील सोने मोडीत काढल्याचे देखील बघायला मिळाले.

रवा वडा रेसिपी

२४ तासात सोन्याचे दरात १ हजाराची घसरण

मात्र गेल्या १५ दिवसापासून सोन्याच्या दरात सतत कमी अधिक प्रमाणत घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात तब्बल १ हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे जीएसटीशिवाय १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५६ हजार ३०० रुपयांवरुन ५५ हजार ३०० रुपयांवर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या खरेदीकडे कल वाढला असल्याचे जळगाव आणि नाशिकमध्ये पाहायला मिळाला.

जागतिक पातळीवर युनायटेड रिझर्व बँकेच्या वतीने ठेवीवर व्याज दर वाढवून देण्याविषयीचे संकेत बैठकीमध्ये देण्यात आले. याचा थेट परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट होऊन सोन्याच्या दरात एका दिवसात १ हजार रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर कमी झाल्याने सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना ही संधी वाटू लागल्याने त्यांचा खरेदीकडे कल वाढला असल्याचे सोने व्यावसायिकांनी सांगितल आहे.

Tags

follow us