‘गोंधळ’ची ऑस्करकडे वाटचाल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

Gondhal Movie : भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या मराठी चित्रपट ‘गोंधळ’च्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Gondhal Movie

Gondhal Movie

Gondhal Movie : भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या मराठी चित्रपट ‘गोंधळ’च्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चित्रपटाच्या पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत चर्चा केली. ही भेट दिग्दर्शक आणि IFTDA चे अध्यक्ष अशोक पंडित यांच्या पुढाकाराने आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी ‘गोंधळ’च्या टीमने अमेरिकेतील चित्रपटाच्या प्रमोशन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्वासाठी आर्थिक आणि पायाभूत मदतीबाबत मुख्यमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडली.

संतोष दवाखर लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित ‘गोंधळ’ची निर्मिती दीक्षा दवाखर यांनी केली आहे. भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून चित्रपटाची निवड झाल्यानंतर आता ‘गोंधळ’ची वाटचाल जागतिक व्यासपीठाकडे सुरू झाली आहे. अमेरिकेत चित्रपटाचा प्रभावीपणे प्रवास पुढे नेण्यासाठी आवश्यक संसाधने आणि योग्य नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात FWICE चे सरचिटणीस अशोक दुबे, IFTDA चे निशांत उज्वल आणि दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्यासह चित्रपटातील कलाकार किशोर कदम, इशिता देशमुख आणि योगेश सोहनी उपस्थित होते.

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ देऊन ‘गोंधळ’ च्या टीमचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल टीमने त्यांचे आभार मानले. ‘गोंधळ’ चा ऑस्कर प्रवास हा केवळ चित्रपटासाठीच नव्हे, तर मराठी सिनेमासाठीही अभिमानाचा क्षण आहे. आता महाराष्ट्राच्या मातीतला हा ‘गोंधळ’ सातासमुद्रापार, ऑस्करच्या व्यासपीठापर्यंत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Exit mobile version