Dearness Allowance : महायुती सरकारने (Mahayuti Government) मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्य कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान वाढ लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता 53 टक्क्यावरुन 55 टक्के (Dearness Allowance) झाला आहे.
राज्यातील सर्व कर्मचारी, पेन्शन धारकांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्य कर्मचारी आणि पेन्शन धारकांना जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 असे एकूण 08 महिन्यांची डी. ए. थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे. राज्य शासन सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसेच निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र असणारे अधिकारी, कर्मचारी व राज्य पेन्शन धारक अधिकारी, कर्मचाऱ्यांना सदर वाढीव डी.ए चा लाभ मिळणार आहे.
INDIA Alliance March : मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात