Gopichand Padalkar on Rohit Pawar for Criticize him at Islampur Sangali : सागंलीच्या इस्लामपूरमध्ये प्रा. डॉ. एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रम पार पाडला. यावेळी रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांच कौतुक करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यावर आता पडळकरांनी असं म्हणत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
मुळात डुप्लिकेटपणा हा पवारांच्यात ठासून भरलेला आहे. त्यात रोहित पवार आज्यावर गेला असून त्याच्या आजोबांनी गेली 50 वर्षे सोनं म्हणून पितळ विकले आहे. चिंध्या पांघरुण सोनं विकता येत नाही. पण सोनं पांघरुण चिंध्या विकता येतात. या म्हणीप्रमाणे चिंध्या विकण्याचा धंदा पवारांनी केलाय. रोहित पवारांची त्यांच्या चुलत्यांनीच तू कसा निवडून आलाय म्हणत, त्याची अब्रू काढली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही.
सलमान खानने ऐश्वर्याच्या खांद्याचं हाड मोडलं अन् कतरिना सोबत…,’या’ अभिनेत्रीने काय सांगितलं?
मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटत आहे. कारण हा (रोहित पवार) औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा, भावांचा घात केला होता. यामध्ये अजित पवार पुरून उरणारे असल्यामुळे टिकलेत. परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते कारण रोहित पवार औरंगजेबासारखी कृती भविष्यात अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल, अशी मला शंका आहे. त्यामुळे मला चिंता करायची गरज नाही, मी पवारांना कसाही असातसा, उलटा-पुलटा पुरून उरलेला आहे. मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे, पण या रोहित पवारांची चिंता अजित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
सांगली जिल्ह्यात संस्कृतीला फार महत्व दिलं जात. आज चंद्रकात पाटील येथे उपस्थित आहेत. आजच्या काळात काही लोक आहेत. पण तुम्ही भाजपचे नेते असले तरी देखील तुम्ही खऱ्या अर्थाने भाजपचं सोनं आहात. त्या पक्षात तुम्ही अनेक वर्ष राहिलेले आहात. जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो. तुम्ही आमचं एकूण घेता. मुलं किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न तुम्ही लगेचच सोडवता. लगेच फोन लावता ही तुमचा स्टाईल आम्हाला आवडते. तुमतं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे. सामाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण आहे. तुम्ही सोनं आहात पण आताच्या काळामध्ये काही बेन्टेक्स लोकं या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. खालंच्या लेव्हलला जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचं काय करायचं ? हे भाजपच्या खऱ्या सोन्याने लक्षात घ्यावं. असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष रित्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती.