Government’s big decision to prevent pollution : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानले जाणारे महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक, 2026 आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात ही माहिती दिली.
सुधारित कर रचनेनुसार, दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर 2000 रुपयांवरून 4000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. पेट्रोल वाहनांसाठी हा कर 3000 रुपयांवरून 6000 रुपये तर डिझेल वाहनांसाठी 3500 रुपयांवरून 7000 रुपये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कर दर पाच वर्षांसाठी एकरकमी आकाराला जाणार आहे.
या सुधारित कर रचनेमुळे राज्याच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा असून दरवर्षी सुमारे 160 कोटी रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार आहे. हा निधी रास्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, एटीएस प्रणाली आणि चालक प्रशिक्षण यांसारख्या महत्वाच्या बाबींवर खर्च केला जाणार आहे. दरम्यान, औद्योगिक क्षेत्राला देखील या विधेयकातून दिलासा देण्यात आला आहे. करेन वाहनांवरील मोटार वाहन कार्यासाठी 30 लाख रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली असून, त्यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
तसेच, या निर्णयामुळे नागरिकांना बीएस-6 आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून राज्याच्या पर्यावरणीय धोरणाला बळकटी मिळणार आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगार निर्मितीला देखील यामुळे गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे, या विधेयकामुळे राज्याच्या एकत्रित निधीवर कोणताही अतिरिक्त भर पडणार नाही. उलट महसूल वाढीस मदत होणार आहे. सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत करत एकमताने मंजुरी दिली आहे. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्वाचा टप्पा ठरणार असून पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक वाढ यांचा समतोल राखण्याचा हा प्रयत्न आहे.
