Download App

Girish Bapat : राज्याने एक अनुभवी संसदपटू गमावला, बापटांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत. तत्पुर्वी, त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोकव्यक्त केला आहे. यामध्ये राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी देखील खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत बापट यांनी संसद सदस्य. राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे. असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. गेल्या अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपणातही कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्याला त्यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता.

पुण्याचा, महाराष्ट्राचा विकास हरपला… Narendra Modi यांच्याकडून बापटांना श्रद्धाजली!

कसबा पोटनिवडणुकीच्या काळात भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गिरीश बापट यांच्या पुण्यातील घरी गेले होते. यावेळी अमित शाह आणि गिरीश बापट यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन प्रकृतीची विचारपूस करत भरपूर गप्पा मारल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. बापट यांची सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारे आणि निवडणुकीच्या राजकारणात माहीर असलेला नेता म्हणून अशी ओळख होती.

Tags

follow us