पुण्याचा, महाराष्ट्राचा विकास हरपला… Narendra Modi यांच्याकडून बापटांना श्रद्धांजली!

पुण्याचा, महाराष्ट्राचा विकास हरपला… Narendra Modi यांच्याकडून बापटांना श्रद्धांजली!

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विकासात विशेषत: पुण्याच्या विकासात खासदार गिरीश बापट यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे, देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचेही आतोनात नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.

पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते. अगदी रिक्षावाल्या काकांशी थांबून ते अस्तेवाईकपणे चौकशी करायचे. तसेच त्यांचे पुणे शहराबरोबरच महाराष्ट्रातील सर्वपक्षिय नेते, कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा अत्यंत जिवाळ्याचा सलोखा होता, असे देखील पंतप्रधान मोदी यांनी विशेष गुण असल्याचे यावेळी सांगितले.

‘ए रिक्षावाल्या नाही, अहो रिक्षावाले म्हणा’, विनोद तावडेंनी सांगितली बापटांची आठवण – Letsupp

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गिरीश बापट हे अत्यंत कष्टाळू नेते होते. त्यांनी पुण्याची आणि महाराष्ट्राची अत्यंत तळमळीने सेवा केली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकास कामात त्यांनी ४०-४५ वर्षे योगदान दिले आहे. सन २०१९ पासून त्यांनी खासदार म्हणून पुणे शहराचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी गेल्या चार वर्षात उत्तम काम केले.

महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि मजबूत करण्यात खासदार गिरीश बापट यांनी अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोककल्याणाचे प्रश्न मांडणारे ते जवळचे आमदार होते. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. त्यांचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

follow us
  • fb
  • instagram
  • youtube