Download App

निवडणुकांचं बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान…

Grampanchayat Election Declared : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By-elections) 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त (State Election Commissioner)यू. पी. एस. मदान (U. P. S. Madan)यांनी केली.

शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. त्या भागातील मतमोजणी 7 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अनेक जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुका देखील प्रलंबित आहेत. त्यामुळे गावगाड्यातील राजकारण काही प्रमाणात शांत झाल्यासारखं दिसत आहे. आता मात्र राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवणुका देखील होणार असल्याने आता गावपातळीवरील राजकारण पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे.

आता गावागावात राजकीय झेंडे उंचावणार आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी आता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लवकरच गुलाल देखील उधळला जाईल.

Tags

follow us