शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

शाळा बंद करुन जाहिरातींवर कोट्यवधींची उधळण; तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

Ahmednagar News : शासनाने आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) हा उपक्रम राज्यभर राबवला. या उपक्रमावर शासनाकडून मोठा खर्च देखील करण्यात आला होता. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळण करत असते. मात्र इथं विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल असे धोरण राबवत आहे, अशी परखड टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

तनपुरे नेमकं काय म्हणाले?
एखादा देश जागतिक महासत्ता तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा तिथले सरकार शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण राबवते. इथे मात्र ‘शासन आपल्या दारी’ सारख्या स्वतःची प्रसिद्धी करवून घेणाऱ्या कार्यक्रमात कोट्यावधी रूपये उधळायचे, त्यासाठी लांबून लोकं घेऊन आणण्याची व्यवस्था करताना शालेय विद्यार्थ्यांचे बसेस अभावी हाल करायचे, स्वतःची जाहिरात करायची. पैसे नाहीत म्हणून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून काय तर म्हणे समूह शाळा चालू करायच्या, अशी टीका प्राजक्त तनपुरे यांनी केली.

Maratha Reservation: मनोज जरांगेची तोफ नगरमध्ये धडाडणार, ‘या’ दिवशी होणार सभा

दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थी यामुळे शिक्षणापासून वंचित राहतील याची जाणीव या संवेदनहीन सरकारला कशी होत नाही? असा सवाल देखील यावेळी तनपुरे यांनी केला. तसेच राज्याच्या भावी पिढीच्या भवितव्याच्या काळजीपेक्षा स्वतःच्या सत्तेची व प्रसिद्धीची काळजी करणाऱ्या या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे, अशी टीका देखील यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

शिंदे सरकारचे दिवाळी गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा तसेच कंत्राटी भरती यामुळे सध्या शासनाविरोधात विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. कंत्राटी भरतीवरून सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील चांगलेच आक्रमक झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube