शिंदे सरकारचे दिवाळी गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

शिंदे सरकारचे दिवाळी गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Cabinet meeting : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील जनतेला दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे. या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव आणि विविध विभागाचे मंत्री, वरिष्ठ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मात्र या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. मंत्रालयात असूनही अजित पवार यांनी बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील मतभेद देखील यानिमित्ताने समोर आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
– दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश
(अन्न व नागरी पुरवठा)

– विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ (ऊर्जा विभाग)

रुग्णालयातील मृत्यू ही हत्याच, सरकारवर 302 दाखल करा; नाना पटोलेंचा हल्लबोल

– अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
(अल्पसंख्याक विकास विभाग)

– नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी (विधी व न्याय)

– इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा (गृहनिर्माण)

MPSC ला मिळाले अध्यक्ष! पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती कारभार

– गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विनाअनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान (उच्च व तंत्रशिक्षण)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube