Maratha Reservation: मनोज जरांगेची तोफ नगरमध्ये धडाडणार, ‘या’ दिवशी होणार सभा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अहमदनगर (Ahmednagar) शहरात येत्या शनिवारी (ता.७) सभा होत आहे. त्या सभेचे नियोजन करण्यासाठी आज सकाळी शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाने, यासाठी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथे जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपोषण करत होते. मात्र उपोषण सुरु असताना पोलीस व उपोषणकर्त्यांमध्ये वादविवाद झाला व उपोषणाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर जोरदार लाठीचार्ज केला.
मात्र या प्रकरणानंतर राज्यात मराठा आंदोलनाने पेट घेतला. महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला असून, आरक्षणाच्या मागणीसाठीचे प्रमुख उपोषणकर्ते जरांगे पाटील सध्या राज्यात दौरा करत आहेत. मराठा समाजाशी संवाद साधत आहेत.
शिंदे सरकारचे दिवाळी गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
याच अनुषंगाने जरांगे पाटील शनिवारी (ता. ७)सायंकाळी सहा वाजता एमआयडीसीतील रेणुका मंगल कार्यालयात जाहीर सभा घेत आहेत. त्या सभेच्या तयारीसाठी अहमदनगर येथे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रयत्न करत असून सभेच्या नियोजनासाठी आज बैठक पार पडली.
नांदेड दुर्घटना! दुरावस्था पाहून खासदार भडकले; डीनच्या हातात मॉप देत शौचालयं साफ करुन घेतलं…
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात जालन्यातील अंतरवली सराटी गावातून केली होती. मराठवाड्यानंतर सोलापूर, नगर, नाशिक, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांचा त्यांचा नियोजित दौरा आहे.