नांदेड दुर्घटना! दुरावस्था पाहून खासदार भडकले; डीनच्या हातात मॉप देत शौचालयं साफ करुन घेतलं…
Nanded Death : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यूच्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. या घटनेवरुन सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असतानाच खासदार हेमंत पाटलांनीही(Hemant Patil) रुग्णालयाची पाहणी करताच चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे. रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पाहताच हेमंत पाटलांनी(Hemant Patil) रुग्णालयाच्या डीन(अधिष्ठाता) यांच्याकडून रुग्णालयाच्या शौचालयाची सफाई करुन घेतली आहे. यावेळी पाटील यांनी दुरावस्थेवरुन रुग्णालय प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं आहे.
पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली : अजितदादा गटातील सर्व मंत्री फडणवीसांच्या भेटीला
नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यामध्ये आणखीन 7 मृतांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट आलं आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असतानाच आता हेमंत पाटीलांनी रुग्णालयाची दुरावस्था पाहुन चांगलेच संतापले. त्यांनी चक्क रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) शौचालय साफ करायला लावले. इतकेच नाही तर त्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
स्वत:ला 10 अन् पक्षाला 14 तास द्या; देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र
मृत्यूच्या घटनेनंतर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी तत्काळ रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तर विरोधकांकडून या घटनेवरुन सरकारचं रुग्णालयाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात घाणीचं साम्राज्य होतं. अनेक शौचालय ब्लॉक असल्याचं समोर आलं होतं. काही शौचालयात सामानही ठेवल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयाची अशी अवस्था पाहुन हेमंत पाटलांनी डीनला स्वत; शौचालय साफ करायला लावलं आहे.
मलाच का बोलता? सर्वांना बोला, नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल; भुजबळांचं जरागेंना प्रत्युत्तर
रुग्णालयातील दुरावस्था पाहुन हेमंत पाटील चांगलेच भडकले आहेत. 24 तासांत 24 मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन या घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यातच औषधाचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली.
नाना पटोलेंचा संताप :
राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोग झाला असून संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली आहे. मोठ्या शहरामध्ये आरोग्य सेवांची ही अवस्था आहे तर ग्रामीण रुग्णालयातील अवस्था काय असेल याची कल्पना न केलेली बरी. शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे झाले असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.