Download App

जी एस महानगर बँक! गीतांजली शेळके नेमक्या आहेत तरी कोण? जाणून घ्या

Gitanjali Shelke : सॉलिसिटर दिवंगत गुलाबराव शेळके यांनी स्थापन केलेल्या जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (GS Mahanagar Bank) निवडणुकीचे

Gitanjali Shelke : सॉलिसिटर दिवंगत गुलाबराव शेळके यांनी स्थापन केलेल्या जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (GS Mahanagar Bank) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत बँकेचे दिवंगत अध्यक्ष उदय गुलाबराव शेळके यांच्या पत्नी गीतांजली उदय शेळके (Gitanjali Uday Shelke) यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल (कपबशी चिन्ह) तसेच गीतांजली शेळके यांच्या नणंद स्मिता पटेल (Smita Patel) उर्फ स्मिता शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या सॉ. गुलाबराव शेळके यांच्या सुनबाई गीतांजली उदय शेळके या नेमक्या आहेत तरी कोण? बँकेच्या जडणघडणीत त्यान्ची असलेली भूमिका याबाबत आपण जाणून घेऊ.

ननंद – भावजयमध्ये रंगणार निवडणूक

पारनेर तालुक्यातील मुंबईस्थित विशेषत: व्यावसायिकांना व व्यापाऱ्यांना एकत्र करून सॉलीसिटर स्व. गुलाबराव शेळके यांनी या बॅकेचे रोपटे लावले. सुरुवातीपासून स्व. शेळके यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिले. पुढे त्यांच्या निधनानंतर बॅंकेची सुत्रे त्यांचे चिरंजीव अँड. उदय शेळके यांच्याकडे आली. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली पहिलीच निवडणूक बिनविरोध केली होती. श्रीयुत उदय शेळके हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष देखील होते. मात्र कालांतराने उदय यांचे देखील अकाली निधन झाले व दोघांच्या पश्चात प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये स्मिता शेळके, तसेच (कै.) उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. विशेष म्हणजे स्मिता पटेल उर्फ स्मिता शेळके यांनी आपल्या आई सुमनताई शेळके यांना पुढे करून त्यांच्या नावाखाली पॅनल उभा केलेला आहे.

कोण आहे गीतांजली शेळके?

गीतांजली यांचे सासरे गुलाबराव यांनी या बँकेची स्थापना केली. गुलाबराव यांच्या निधनानंतर बँकेची सूत्रे त्यांचे चिरंजीव व गीतांजली यांचे पती उदय शेळके यांच्या हाती गेले. उदय यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेत बँकेला एका वेगळ्या उंचीवर नेले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत उदय शेळके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर गीतांजली शेळके यांची बिनविरोध संचालिका म्हणून निवड झाली. त्या जी एस महानगर बँकेच्या देखील संचालिका आहेत.

सासरे व पतीच्या मार्गदर्शन हे गीतांजली यांना भेटले व त्यांनी देखील बँकेच्या उत्कर्षासाठी नेहमीच धोरणात्मक बाजू मांडल्या. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गीतांजली शेळके यांचे सख्खे मामा आहेत. गीतांजली शेळके यांना सामाजिक व राजकीय वारसा दोन्ही बाजूंनी लाभलेला आहे. शेळके कुटुंबीय हे प्रथमपासूनच शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबतच राहिलेले आहेत. या दोघांचे देखील गीतांजली शेळके यांना कायम मोलाचे मार्गदर्शन मिळत आले. गीतांजली शेळके यांच्या पुढाकाराने शेळके कुटुंब यांचे मूळ गाव पिंपरी यांनी नाम फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पाणी पुरस्कार पटकाविला. तसेच सॉ. उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन तर्फे पारनेर तालुक्यातील जलसंधारणमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गावांना “जलसेन” पुरस्कार देण्यात आले.

गुलाबराव शेळके व उदय दादा शेळके यांना बँकिंग क्षेत्राबद्दल असलेले आपुलकी बघून नुकतेच उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन मार्फत मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने “सहकार परिषदेचे” देखील आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना राजकीय व सामाजिक वर्तुळात गुलाबराव शेळके व उदय शेळके यांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.

गीतांजली शेळकेंना वाढता पाठिंबा

निवडणुकीच्या सुरुवातीलाच गीतांजली शेळके यांच्या पॅनलचे एक उमेदवार संतोष रणदिवे यांच्या बिनविरोध निवडीने सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने विजयाची सुरुवात केली. जी.एस. महानगर बँकेच्या या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले शिवाजीराव वराळ यांनी आपला बिनशर्त पाठिंबा गीतांजली शेळके यांच्या पॅनलला जाहीर केला. तसेच सुरुवातीपासूनच गीतांजली शेळके यांना मोठा पाठिंबा मिळाला.

अनेक कार्यकर्ते उमेदवारीची अपेक्षा न करता गीतांजली शेळके यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विरोधी पॅनलला तर पॅनल मधील सर्व उमेदवार देखील उभे करता आलेले नाहीत. त्यामुळे गीतांजली शेळके यांच्या पॅनल मधील एक बिनविरोध आलेला उमेदवार तसेच विरोधी पॅनल मधील कमी असलेले उमेदवारांमुळे यांचा अजून एक उमेदवार निवडून आल्यात जमा आहे. थोडक्यात गीतांजलीताई शेळके यांच्या पॅनलचे दोन उमेदवार निवडून आल्या जमा आहेत. यामुळे सुरुवातीपासूनच गीतांजली शेळके यांच्या पॅनलचा या निवडणुकीत वरचष्मा राहिला आहे.

राजकीय पाठबळ

बँकेमध्ये संचालिका पदावर काम करत असताना गीतांजली शेळके यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यामुळे त्यांना राजकीय पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने पहिले तर राजकारणातील एक मोठे नाव म्हणजे पवार कुटुंब हे अग्रस्थानी आहे.

सावधान… देशात पुन्हा कोरोना; 1000 हून सक्रिय रुग्ण ; सर्वाधिक ‘या’ राज्यात

तर त्यांच्या पाठोपाठ आमदार महेश लांडगे, आमदार काशिनाथ दाते, खासदार निलेश लंके, पुण्याचे महापौर राहुल जाधव, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव आडसूळ, आमदार प्रविण दरेकर, आमदार बाळाराम पाटील, आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह बॅंकिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांचा गीतांजली शेळके यांना पाठिंबा असल्याने विजयाची वाट त्यांच्यासाठी सुकर झाली आहे.

follow us

संबंधित बातम्या