जी.एस. महानगर सहकारी बँकेची निवडणूक रंगात; सासू-सुना एकमेकींविरोधात

जी.एस. महानगर सहकारी बँकेची निवडणूक रंगात; सासू-सुना एकमेकींविरोधात

G.S. Mahanagar Sahakari Bank election Mother-in-law Suman Shelake and daughter-in-law Gitanjali Shelake are against each other : दिवंगत गुलाबराव शेळके संस्थापक अध्यक्ष असलेल्या मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जी. एस. महानगर सहकारी बँकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे.यामध्ये सासू विरूद्ध सून असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये सून गीतांजली शेळकेंच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलतर्फे प्रचार सुरू झाला आहे.
रविवारी दारूची बाटली लागतेच…अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीताने सांगितला ‘ब्रँड’

पॅनलच्या प्रमुख गीतांजली उदयदादा शेळके यांनी उमेदवारांसह मुंबईतील लालाबाग मार्केट परिसरात बँकेच्या सर्वसामान्य सभासदांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केल्या आहेत. यावेळी गीतांजली शेळके म्हणाल्या की, सर्वसामान्य सभासदांनी सॉ. गुलाबराव शेळके व उदय शेळके यांची आठवण काढली. आपल्याला ही बँक टिकवायची आहे. बँकेला गतवैभव मिळवून द्यायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ना रश्मिका, ना कियारा फक्त इन्स्टाग्राममुळे तमन्नाला मिळणार 6 कोटी; कर्नाटकच्या साबणाची डील काय?

निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुंबईचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नितीन काळे यांनी याबाबत माहिती दिली असून 19 जूनला मतदान घेण्यात येणार आहे. बँकेतील संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 96 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असेच दिसते. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये सासू विरुद्ध सून अशी लढत होणार आहे. दरम्यान या बँकेचे इतिहास काय आहे? व निवडणुकींमधील ही लढत कशी असणार आहे याबाबत आपण जाणून घेऊ.

iPhone 15 वर चक्क 11,797 रुपयांचा डिस्काउंट, खरेदीची सुवर्णसंधी

पारनेर तालुक्यातील मुंबईस्थित विशेषत: व्यावसायिकांना एकत्र करून सॉलीसिटर स्व. गुलाबराव शेळके यांनी या बॅकेचे रोपटे लावले. सुरुवातीपासून स्व. शेळके यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिले. पुढे त्यांच्या निधनानंतर बॅंकेची सुत्रे त्यांचे चिरंजीव अँड. उदय शेळके यांच्याकडे आली. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली पहिलीच निवडणूक बिनविरोध केली होती. मात्र कालांतराने उदय यांचे देखील निधन झाले व दोघांच्या पश्चात प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुमन व स्मिता शेळके, तसेच (कै.) उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.

पारनेरची कामधेनू

ही महानगर बँक ही पारनेर तालुक्याची कामधेनू आहे. अनेक उद्योजक या बँकेने उभे केले आहेत. मुंबईतील पारनेरकरांना या बँकेचा आधार आहे. जीएस महानगर बँकेचा 1973 साली सुरू झालेला हा प्रवास एका छोट्याशा 9 बाय 18 चौरस फूट खोलीतून सुरु झाला. पुढे गुलाबराव शेळके आणि त्यांचे सहकाऱ्यांनी अथक परिश्रमातून ही बॅक नावारूपाला आणली.आज जीएस महानगर बँकेचा विस्तार संपूर्ण राज्यभरात झालेला आहे.बँकेचे 80 हजार 410 भागधारकांचा बँकेवर ठाम विश्वास असून 68 कोटी 61 भाग भांडवल आहे. 2 हजार 884 कोटींची भक्कम ठेव असून राज्यभर 70 शाखांचा विस्तार झालेला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube