Download App

पालकमंत्री दीपक केसरकरांना नागरिकांचा घेराव

  • Written By: Last Updated:

कोल्हापूर : कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak Kesarkar) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिरातील व्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान, यावेळी संतप्त कोल्हापुरकरांनी पालकमंत्री केसरकरांना घेराव घालून जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे (West Maharashtra Devasthan Committee) सचिव शिवराज नाईकवाडे (Shivraj Naikwade) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पदावरुन का हटवण्यात आले? असा सवाल करत त्यांना पदावर पुन्हा घेण्यात यावे, ही मागणी नागरिकांनी केसरकरांकडे केली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितींतर्गत देवस्थानांच्या कारभारात बदल घडवून आणण्यासाठी काम करणारे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा समिती सचिवपदाचा कार्यभार कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अचानक काढून घेत त्यांना कार्यमुक्त केलं. धर्मादाय उपायुक्त कार्यालयात सेवेत असलेल्या नाईकवाडे यांच्याकडे दीडेक वर्षाआधी या देवस्थान समितीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र, आता जिल्हाधिकारी रेखावर यांनी त्यांना कार्यमुक्त करून राधानगरी कालचे प्रांताधिकीर सुशांतकिरण बनसोडे यांच्याकडे हा कार्यभार सोपवला आहे.

नाईकवाडे यांनी सचिव पदावर असतांना कलेक्टराच्या मार्गदर्शनाखाली समितीमधील खाबुगिरी, निविदांमधून टक्केवारीची पद्धत बंद केली. काही दानशूर भक्तगणांना सोबत घेऊन अंबाबाई, जोतिबा देवस्थानांसह समितीच्या कामकाजात अनेक सुधारणा केल्या. विकासाची बरीच कामे केली आणि अशा अधिकाऱ्याला कोणतंही कारण न देता शुक्रवारी सकाळी पदमुक्त करण्यात आलं. त्यामुळे कोल्हापुरक चांगले संतप्त झाले आहेत. दरम्यान, नाईकवाडे यांना पदमुक्त केल्यानंतर अनेकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटायलाही गेले होते. त्यांनी हा निर्णय बदलला नाही तर आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा नागरिकांनी दिला होता.

न्यायव्यवस्था टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न ; रिजिजूंच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप..

मात्र, या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयात अद्याप कोणताही बदल न झाल्याने आज नागरिकांना पालकमंत्री केसरकरांना घेराव घातला. पालकमंत्री केसरकर हे आज कोल्पापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी अंबाबाई मंदिरातून व्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेणार आहेत. यावेळी नागरिकांनी पालकमंत्र्यांचा रस्ता अडवला. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना हटवल्याचा निषेध केला. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी त्यांचा पदभार का काढून घेतला? असा सवाल नागरिकांनी पालकमंत्र्यांना केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूरकरांची घोषणाबाजी करत पुन्हा नायकवाडे यांना पदभार द्यावा, अशी मागणी केली

बबनराव रानगे यांनी सांगितलं की, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना कार्यमुक्त केलं आहे. खरंतर ते एक सक्षम अधिकारी होते. अंबाबाई मंदिराचा विकास करण्याचं काम नाईकवाडे यांनी केलं. त्यांना कार्यमुक्त करणं हे कोल्हापुरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, त्यामुळं त्यांना पुन्हा पदावर घेण्यात यावं, अशी मागणी रानगे यांनी केली.

Tags

follow us