न्यायव्यवस्था टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न ; रिजिजूंच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप..

न्यायव्यवस्था टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न ; रिजिजूंच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप..

Sanjay Raut :  देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत असे वक्तव्य कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही रिजिजू यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राऊत म्हणाले, की देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये ती टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. सरन्यायाधीशांवर काही बोलणार नाही पण रिजिजू कायमच न्यायमूर्तींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असतात. काही न्यायमूर्ती सरकारविरोधी वक्तव्ये करतात असे ते म्हणाले होते पण, सरकारविरोधी बोलणे म्हणजे काही देशद्रोह नाही. असे बोलणे म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव आहे. देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये ती सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली रहावी.

वाचा : बार्शीत अत्याचार; संजय राऊतांकडून फडणवीस लक्ष्य, चित्रा वाघ-शेलारांचे प्रत्युत्तर

आमचं ऐकलं नाही तर बघून घेऊ, आम्हाला हवे तसे निर्णय द्या अशा धमक्या दिल्या जातात. राज्यपालपद देऊ, बाकीचे पद देऊ ती घ्या गप्प बसा, अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत हा कायदमंत्र्यांचा दबाव नाही तर काय ? असा सवाल राऊत यांनी केला.

न्याययंत्रणेला धक्का देणारे सरकार यालाच तर हुकुमशाही म्हणतात. राहुल गांधी यांनी यावरच आवाज उठवला ते योग्य केले. आवाज उठवला आहे, त्यामुळे राहुल गांधी यांचं लोकसभेचे सदस्यपद बाद करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी आम्ही आज दिल्लीत जात आहोत.

शेतकऱ्यांशी चर्चेसाठी ‘फुसके’ मंत्री नेमले, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

हे सरकार सत्तेत आल्यापासून संविधान आणि कायदा मानत नाही हे स्पष्ट झाल आहे. न्यायव्यवस्था खिशात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहेत. परंतु देशात अजून असे काही न्यायाधीश उरलेले आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत. त्यांना अशा प्रकारचा धमक्या दिल्या जातात, असे राऊत म्हणाले.

राहुल गांधी माफी मागणार नाही. मी काँग्रेस प्रवक्ता नाही. पण राहुल गांधी यांनी का माफी मागावी ?  लोकशाही वर प्रश्न उपस्थित केले, यात त्यांची काय चूक ? लोकशाही वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. त्यामुळे त्यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube