शिंदेंकडे गुदगुली करण्याचे गुण, जरांगेंना 100 टक्के त्यांचाच पाठिंबा; सदावर्तेंचा पुन्हा गंभीर आरोप

Gunratna Sadavarte Criticise to DCM Eknath shinde एकनाथ शिंदे जरांगेंना 100 टक्के मदत करत आहेत. असा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केला.

Gunratna Sadavarte Criticise To DCM Eknath Shinde

Gunratna Sadavarte Criticise To DCM Eknath Shinde

Gunratna Sadavarte Criticise to DCM Eknath shinde on Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनावर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte ) यांनी गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे यांचे हे आंदोलन सर्वपक्षीय मराठ्यांचे कुंभाड आहे. भाजपमधील मराठा मंत्री सुद्धा त्यात गुंतलेले आहेत. एकनाथ शिंदे जरांगेंना 100 टक्के मदत करत आहेत. असा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केलाय. ते लेट्सअप मराठीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. त्यात आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गुदगुली करण्याचे गुण आहेत. त्यात मनोजला रास लागलीय त्यात हे सोन्याच्या चमच्याने गुदगुली करत आहेत. एकनाथ शिंदे जरांगेंना 100 टक्के मदत करत आहेत. शिंदेंचा डोलारा मोठा आहे. ते मातंग समाजाला उपवर्गीकरणाच्या लढ्यात मदत करत आहेत. जरांगेंना मदत करत आहेत. मात्र भिडे गुरूजी आणि गुणरत्न सदावर्ते हे कोणत्याही टेंडरसाठी भूमिका घेत नाहीत. राजकीय पदासाठी लाईनमध्ये उभं राहत नाहीत.

झी-गुगलची मोठी भागीदारी; टीव्ही मालिकांमध्ये प्रथमच एआय सर्चचं फिक्शन-आधारित एकीकरण

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे दावे करत जरांगे यांच्यावर जोरदार टीका केलीय. ते किती वेळेस मुख्यमंत्र्यांचे घर टार्गेट करत आहे. ते तेली समाजाच्या मंत्र्यांना डुक्कर तोंड्या म्हणतात. किती वेळेस माझ्यासारख्या माणसाला टमरेल म्हटलंय, असे होते का तेव्हा ? कारण मराठा मुख्यमंत्री होते. राणे अपवाद आहेत. ते जरांगेंच्याविरोधात आहेत. जरांगे यांच्या रुपाने वैचारिक बुजगावणे तयार केले आहे. प्रोजेक्ट केलेले आहे, असे सदावर्ते म्हणाले.

‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या राजगड दुर्गसंवर्धन मोहिमेत हजार स्वयंसेवकांचा सहभाग

आरक्षणामुळे ओबीसीमध्ये एन्ट्री झाली आहे. गावांमध्ये एससीच्यानंतर ओबीसीचा नंबर येतो. ओबीसींचे सरसकट ओरबडून घ्यायचे आहे. त्यांना राजकीय समूळ नष्ट करायचे आहे, ही थीम आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बिगर मराठा आहेत. महसूलमंत्री बिगर मराठा आहेत. त्यांना आई, बहिणीवरून खालच्या स्तरावर जावून बोलले जाते आहे, असे सदावर्ते म्हणाले.

Exit mobile version