जरांगेंचे आंदोलन सर्वपक्षीय मराठ्यांचे कुंभाड; भाजपचे मंत्री विखेही…गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
Gunratna Sadavarte: आरक्षणामुळे ओबीसीमध्ये एन्ट्री झाली आहे. गावांमध्ये एससीच्यानंतर ओबीसीचा नंबर येतो. ओबीसींचे सरसकट ओरबडून घ्यायचे आहे.
Gunratna Sadavarte On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनावर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte ) यांनी गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे यांचे हे आंदोलन सर्वपक्षीय मराठ्यांचे कुंभाड आहे. भाजपमधील मराठा मंत्री सुद्धा त्यात गुंतलेले आहेत. विखे पाटील यांचाही आंदोलनाला पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केलाय.
Nepal Flood : देव तारी त्याला कोण मारी; ढिगाऱ्याखाली पाच वर्षांची मुलगी जिवंत सापडली
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे दावे करत जरांगे यांच्यावर जोरदार टीका केलीय. ते किती वेळेस मुख्यमंत्र्यांचे घर टार्गेट करत आहे. ते तेली समाजाच्या मंत्र्यांना डुक्कर तोंड्या म्हणतात. किती वेळेस माझ्यासारख्या माणसाला टमरेल म्हटलंय, असे होते का तेव्हा ? कारण मराठा मुख्यमंत्री होते. राणे अपवाद आहेत. ते जरांगेंच्याविरोधात आहेत. जरांगे यांच्या रुपाने वैचारिक बुजगावणे तयार केले आहे. प्रोजेक्ट केलेले आहे, असे सदावर्ते म्हणाले. आरक्षणामुळे ओबीसीमध्ये एन्ट्री झाली आहे. गावांमध्ये एससीच्यानंतर ओबीसीचा नंबर येतो. ओबीसींचे सरसकट ओरबडून घ्यायचे आहे. त्यांना राजकीय समूळ नष्ट करायचे आहे, ही थीम आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बिगर मराठा आहेत. महसूलमंत्री बिगर मराठा आहेत. त्यांना आई, बहिणीवरून खालच्या स्तरावर जावून बोलले जाते आहे, असे सदावर्ते म्हणाले.
‘दोन टर्मच्या आमदाराला सरोगसीचा अर्थ माहिती आहे का?’ अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं
मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात. ते जरांगे यांचे पण आहेत. पण जरांगे पुन्हा मुख्यमंत्र्यांबाबत अरे तुरे बोलले आहेत. हे विलासराव देशमुखांबाबत बोलू शकतात का ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत ते अरे तुरे बोलू शकतात का असा सवाल सदावर्ते यांनी जरांगे यांना विचारला आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय मराठ्यांचे कुंभाड आहे. भाजपचे मराठा मंत्री सुद्धा त्यात गुंतलेले आहे. विखे पाटील यांचा पाठिंबा ही असल्याचा दावा सदावर्ते यांनी केलाय. अंदर कुछ और है, बहार कुछ और है ! शेवटच्या बैठकीला राधाकृष्ण विखे, प्रसाद लाड, उदय सामंत, मनोज जरांगे यांची माध्यमासमोर एक झाली आहे. घरात एक झाली. पीडब्लूडीचे काय टेंडर चर्चेत आहे, मला माहिती नाही. समाजाला माहिती नाही. मी सत्य बोलू लागते. मी पुरावा देऊ शकतो, असा दावा सदावर्ते यांनी केलाय.