Gunratna Sadavarte : तुकाराम मुंढे भीमनवारांची चौकशी करु शकत नाही; गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

Gunratan Sadavarte : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनावर अखेर

Gunratan Sadavarte

Gunratan Sadavarte

Gunratan Sadavarte : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला आहे. सरकारने पेपरफुटी प्रकरणात चौकशी समितीची नेमणूक केली आहे. राज्य सरकारने चौकशीच्या समितीच्या सचिवपदी अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे एमपीएससी अध्यक्ष भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा देखील निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वात सुरु असणारा आंदोलन स्थगित झाला असून गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनवावर भाष्य करत तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) भीमनवार यांची चौकशी करु शकत नाही असं म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये संविधान असताना कशा प्रकारे एमपीएससी विद्यार्थ्यांची फसवणूक रोहित पवार ह्या पब्लिक सर्व्हंट असलेल्या व्यक्तीने केली. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा अपराध केला आहे. ज्याप्रकारे 10 दिवस एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांना काही तासांसाठी दररोज दोन स्मशानभूमी बाजूला असलेला शांततेच्या जागेत, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची शांतता भंग केल्याचे आम्ही सगळं डोळ्याने पाहत होतो. केविलवाण्या पद्धतीने तो दाखवत होता की, मासा पाण्याबाहेर जसा तडफडतो तसा तो सत्तेशिवाय तडफडत होता. विद्यार्थ्यांना काहीच मिळणार नाही हे आम्हाला माहिती होतं, हे फक्त राजकारण होणार हेही माहित होतं असं या पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते म्हणाले.

तर या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, भीमनवार यांच्या विरोधात तुकाराम मुंढे हे सचिव एखाद्या आयोगाच्या अध्यक्षांविरोधाच्या चौकशीत असू शकत नाहीत, त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. सेवानिवृत्त न्यायामूर्ती हे आहेत, ते देखील भीमनवार चौकशी करु शकत नाही असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तर रोहित पवारला आता पळत जावं लागेल विद्यार्थी त्याला आता सोडत नसतात.

Drishyam The Conclusion ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल; 500 कोटींच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

कमल 317 सांगतो की, राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करायची आहे आणि त्यांनी जर चौकशीचे आदेश दिले तर त्याला मुभा असते.  पण, रोहितच्या आजोबांच्या काळात लोकसेवा आयोगामध्ये घोटाळे झाले आहेत. आपल ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकून ही पवारांची खासियत आहे असं देखील पत्रकार परिषदेत वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Exit mobile version