Download App

Video: हर्षवर्धन पाटील क्षमता असलेला नेता; त्यांचा ‘तो’ निर्णय चुकला, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

हर्षवर्धन पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये जातीलल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी वक्तव्य केलं

  • Written By: Last Updated:

Congress leader Balasaheb Thorat : भारतीय जनता पार्टीची कृती दुर्दैवाने ही लोकशाहीच्या (Congress ) हिताची नाही.  ऑपरेशन लोटस, पैसे द्यायचे आणि आमदार फोडायचे. भ्रष्टाचारातून पैसा मिळवणं आणि त्या पैशाचा वापर राजकारणासाठी भाजप करत असतो. हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या होत्या, त्यांचा निर्णय चुकला का काय अशी परिस्थिती आता सध्या आहे अशी थेट प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

भाजपने फोडला राष्ट्रवादीचा आमदार; निवडणुकीआधीच अजितदादांना मोठा झटका..

जागा वाटपामध्ये कोण निवडून येईल याचा विचार करून जागावाटप करणार आहोत. महाविकास आघाडीला 180 जागां मिळतील असं भाकीतही थोरात यांनी यावेळी केलं आहे. मागील वेळेस देवेंद्र फडणवीसांना मी म्हटलं होतं की, आरशात पहा तुम्ही विरोधी पक्ष नेता दिसताय. परंतु, आता अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष देता कोण ? असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

follow us